Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अँड्रॉइड वन लवकरच होणार लाँच

IT news
गुगल भारतात अँड्रॉइड वन प्रोजेक्ट पुन्हा लाँच करण्याच्या तयारीत आहे. नवा अँड्रॉइड वन स्मार्टफोन रु. 3000 उपलब्ध असणार आहे. कंपनी येत्या काळात असेच काही स्वस्त अँड्रॉइड स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. 
 
फायनॅनशियल टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत दक्षिण-पूर्व आशियाचे व्यवस्थापकीय संचालक राजन आनंद यांच्या मते, ‘या नव्या प्रोजेक्टबाबत आम्ही फारच गंभीर आहोत. पुढील काही आठवड्यातच अँड्रॉइड वनच्या नव्या प्लानचं लाँचिंग करण्यात येईल.’ 
 
या प्लॅनमध्ये गुगल 50 डॉलरपर्यंत स्मार्टफोन लाँच करू शकतं. म्हणजे जवळपास 3000 रुपयांपर्यंत याची किंमत असू शकते. मागील महिन्यात अँड्रॉइड वनच्या पुनरागमनासाठी गुगलने ‘लावा’सोबत मिळून अँड्रॉइड वन स्मार्टफोन Pixel V1 लाँच केला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi