Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आय फोन 7 चे प्री बुकिंग सुरु, 7 ऑक्टोबरला उपलब्ध होणार

आय फोन 7 चे प्री बुकिंग सुरु, 7 ऑक्टोबरला उपलब्ध होणार
अॅप्पल या सर्वात मोठ्या आणि मोबाईल बनविणार्‍या कंपनीने अमेरिकेत आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लस विक्रीस उपलब्ध करून दिले आहेत. तर भारतामध्येही अॅपलच्या या फोन्सची लाँच होण्यापूर्वीच प्री बुकिंग म्हणचे आगाऊ नोंदणी सुरु करण्यात आली आहे. प्री बुकिंग केलेल्या फोन्सची डिलिव्हरी 7 ऑक्टोबरपासून देण्यात येणार आहे. 
 
भारतात येत्या 7 ऑक्टोबर 2016 रोजी आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लस उपलब्ध होत आहेत. तर भारतात बिना दिक्कत लवकर फोन हवे असल्यास त्या अॅप्पल वेबसाईटवर 5 हजार रुपये अॅडव्हान्स देऊन फोनची बुकिंग सुरु आहे. तसेच भारतातील काही प्रीमियम डीलर असून तेथेही आगाऊ पैसे भरून नोंदणी करता येणार आहे.
 
नवीन आयफोन पुन्हा बाजारात सरस ठरत असून नवीन आयफोन 7 32 GB, 64 GB आणि 256 GB या व्हेरीयंट मध्ये उपलब्ध आहे. तर आयफोन 7 प्लस हा 32 GB, 128 GB आणि 256 GBमध्ये उपलब्ध असेल. आयफोन 7 मध्ये 2 GB रॅम तर आयफोन 7 प्लस आणि अॅ5पल वॉच 2मध्ये 4 GB रॅम देण्यात आली आहे.
 
आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लसमध्ये स्टेरिओ स्पीकर्स आहे. यामध्ये रेटिना HD डिसप्ले आहे. आयफोन 3D टच असून वायरलेस पद्धतीने चार्ज करता येणार आहेत. आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लसमध्ये 3.5mm ऑडिओ जॅक नाही. अॅपल इयर पॉड्स लायटनिंग कनेक्टरद्वारे वापरता येऊ शकतात.
 
यामध्ये ऑपरेटिंग सिस्टम : iOS 10 आहे. तर त्यातील कॅमेरा : रिअर कॅमेरा 12 मेगापिक्सेल, फ्रण्ट कॅमेरा 7 मेगापिक्सेल, ड्यूएल कॅमेरा सेटअप (वाईड अँगल मॉड्यूल आणि टेलिफोटो) आहे. तर रंगाचा विचार केला तर नवीन रंग आले असून ब्लॅक, जेट ब्लॅक, सिल्व्हर, गोल्ड, रोज गोल्ड उपलब्ध आहेत. तर होम बटन थोडा बदल असून पूर्वीच्या बदला पेक्षा  होम बटणऐवजी फोर्स सेन्सिटिव्ह उपलब्द करून दिले असून, इतर फोनच्या मानाने हे अनेक पट वेगवान आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाप्रसादातून शेकडो भक्तांना विषबाधा