Publish Date: Mon, 22 Jun 2015 (11:21 IST)
Updated Date: Mon, 22 Jun 2015 (11:27 IST)
भारतीय रेल्वेने प्रवास करत असाल व तुमचा डबा खूपच घाण असेल तर केवळ 15 मिनिटांत तो साफा सुथरा होण्याची व्यवस्था रेल्वेने केली असून त्यासाठी क्लिन माय कोच नावाचे अँप तयार केले आहे. या अँपच्या मदतीने प्रवासी डबा स्वच्छतेसाठी ऑनलाइन तक्रार दाखल करू शकणार आहेत आणि तक्रार दाखल होताच 15 मिनिटांत सफाई कर्मचारी डबा साफा करून देणार आहेत.
सेंट्रल रेल्वेने या अँपच्या चाचण्या यशस्वी ठरल्याचे सांगताना दीर्घ पल्ल्याच्या रेल्वे गाडय़ात ही योजना लवकरच सुरू होत असल्याचे जाहीर केले आहे. सेंट्रल रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी या संदर्भात म्हणाले की, रेल्वेने हे अतिशय उपयुक्त अँप विकसित केले आहे. वास्तविक रेल्वेत स्वच्छता कङ्र्कचारी ऑन बोर्ड असतात पण प्रवाशांना त्यांना शोधून स्वच्छता करून घेणे बरेचदा अडचणीचे जाते. त्यामुळे या अँपच्या साहाय्याने अर्ज करणे अतिशय सुलभ होणार आहे. सुरेश प्रभू यांनी रेल्वे मंत्रालयाची सूत्रे हाती घेतल्यानंतर हाऊस किपिंग डिपार्टमेंट स्थापन केले आहे.
या विभागाकडे रेल्वेच्या सफाईबरोबरच ए,बी,सी क्लासची रेल्वे स्टेशन सफाईची जबाबदारीही सोपविली गेली आहे.