Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वन प्लसचा बजेट फोन लवकरच येणार

oneplus
चिनी स्मार्टफोन कंपनी वनप्लसने त्यांच्या फ्लॅगशीप वन प्लस फोन मालिकेतील वन प्लस टूचा बजेट फोन वन प्लस एक्स नावाने बाजारात लवकरच आणला जात असल्याचे संकेत दिले आहेत. अंतर्गत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वन प्लस एक्स ऑक्टोबरमध्येच बाजारात दाखल होत आहे.
 
या फोनसाठी 5 इंचाचा डिस्प्ले, लेदर बॅक, डय़ूअल कॅमेरा लेन्स, फिंगरप्रिंट सेन्सर ही फीचर्स असतील. वन प्लसचे सहसंस्थापक कार्ल पेई यांनी दिलेल्या संकेतानुसार हा फोन स्पेसिफिकेशनपेक्षा डिझाईनला अधिक पसंती देणार्‍या ग्राहकांना भुरळ घालेल. वन प्लस टूपेक्षाही याचे डिझाईन अधिक चांगले केले गेले आहे. हा फोन साधारण 15 ते 20 हजार रूपयांच्या रेंजमध्ये उपलब्ध होईल. अँड्राईड बेसवर आधारित हा फोन 249 डॉलर्समध्ये उपलब्ध करून दिला जाईल असे एका मोबाइल स्पेशल मासिकात नमूद केले गेले आहे.

 

Share this Story:

Follow Webdunia marathi