Publish Date: Tue, 21 Jul 2015 (11:19 IST)
Updated Date: Tue, 21 Jul 2015 (11:20 IST)
फेसबुकवरील लाइक आणि मार्क अँज अनरिड हे फीचर व्हॉट्स अँपवर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. व्हॉट्स अँप हे मेसेजिंग अँप काही दिवसांपूर्वीच फेसबुकने विकत घेतले आहे. त्यामुळे फेसबुकचे अनेक फीचर्स व्हॉट्स अँपमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या वर्षी फेसबुकने व्हॉट्स अँप विकत घेतलं.
मात्र, त्यानंतर उल्लेखनीय असे काही बदल दिसून आले नाहीत. मात्र, आता फेसबुकचे अनेक फीचर्स व्हॉट्स अँपमध्ये आल्यास आश्चर्य वाटायला नको.मेसेजिंग अँप व्हॉट्स अँप लवकरच नवं फीचर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. आगामी काळात फेसबुकचेच काही फीचर्स व्हॉट्स अँपवर दिसण्याची शक्यता आहे.