Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज ठाकरे

राज ठाकरे

विकास शिरपूरकर

PR
राज श्रीकांत ठाकरे, मराठीच्‍या मुद्यावरून राज्‍य आणि देशभरातच नव्‍हे तर जगभरात चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेला नेता. वर्षानुवर्षे मराठी माणसाच्‍या मनात धगधगत आणि सलत असलेल्‍या दुःखावर राज यांनी फुंकर घातली आणि नवनिर्माणाचे रान उठले. नवनिर्माणच्‍या या आंदोलनाने अनेक दशके राज्याची सुत्रे चालवित असलेल्‍या प्रस्‍थापितांच्‍या पायाखालची वाळू सरकविली असून यंदाच्‍या विधानसभेत राज यांची ही नवनिर्माणची ताकद मोठे आव्‍हान उभे करणार असल्‍याची झलक लोकसभेच्‍या निवडणुकीने दाखवूनच दिली आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्‍या संस्‍कारात राजकारणाचे बाळकडू प्यायलेल्या या नेत्याने अल्‍पावधीतराज्याआपलस्‍थाकेवळ 'न्‍यूजमेकर'चेच नव्‍हे तर आगामनिवडणुकीनंतप्रसंगी 'किंमेकर'चेहअसशकतसिध्‍केलआहे.

शिवसेनेत आपल्‍याला डावलले जात असल्‍याची भावना निर्माण झाल्‍याने त्यांनी शिवसेना सोडली. त्‍यानंतर राज्यभर दौरा करून व कार्यकर्त्‍यांशी चर्चा करून त्‍यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्‍या पक्षाची स्‍थापना केली. चाळीसच्‍या दशकात ज्‍या मराठीच्‍या आणि स्‍थानिकत्‍वाच्‍या मुद्याने शिवसेनेला उभे केले तोच मुद्दा नव्‍या संदर्भात उचलून त्यांनी राज्‍याच्‍या राजकारणात प्रस्‍थापित पक्षांसमोरही मोठे आव्‍हान उभे केले आहे.

राज्यातील नोकर्‍यांमध्ये मराठी तरुणांना प्राधान्‍य दिले जावे या त्‍यांच्‍या प्रमुख मुद्यामुळे अल्‍पावधीतच पक्षाने राज्यभरात आपले समर्थक उभे केले असून नुकत्याच झालेल्‍या लोकसभा निवडणुकीत प्रस्‍थापित पक्षांसमोर मनसेने तगडे आव्‍हान उभे केल्‍याने राज्यातील विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मात्र या जहाल, कणखर आणि खंबीर राजकारण्‍यामागे एक हळूवार मनाचा कलावंतही दडलेला आहे. हे ब-याच कमी जणांना माहीत असावं. महाराष्‍ट्राच्‍या राजकारणात ठाकरे कुटुंबीय जितके जहाल आणि वादग्रस्‍त म्हणून ओळखले जातात. तितकाच त्‍यांना महाराष्‍ट्राच्‍या सांस्‍कृतिक वर्तुळातही मानाचे स्‍थान आहे. ठाकरे घराण्‍यातून रक्तातच उतरलेला हा कलेचा गूण राज यांच्‍यासाठी तरी कसा अपवाद ठरणार.

अवघ्‍या महाराष्‍ट्राचे वैचारिक प्रबोधन करणा-या प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्‍या विचारांचे बाळकडू आणि बाळासाहेब ठाकरे यांच्‍यातील जहाल राजकारण्‍याचा वारसा घेऊन वाढलेल्‍या राज यांच्‍यावर लहानपणापासूनच कलेचे संस्‍कारही झाले आणि म्‍हणूनच राज हे राजकारण्‍या इतकेच व्‍यंगचित्रकार म्हणूनही सर्वपरिचित आहेत.

राज यांचे पिताश्री स्‍व.श्रीकांत ठाकरे हे स्‍वतः मराठीतील एक चांगले संगीतकार होते. तर काका बाळासाहेब ठाकरे हे मार्मिक व्‍यंगचित्रकार.

श्रीकांत आणि कुंदा ठाकरे यांच्‍या पोटी 14 जून 1968 रोजी जन्‍मलेल्‍या राज यांचे शिक्षण मध्‍य मुंबईतील बाल मोहन विद्या मंदिरात झाले. लहानपणापासून चित्रकलेची आवड असलेल्‍या राज यांनी महाविद्यालयीन शिक्षण सर जे.जे स्‍कूल ऑफ आर्ट्समधून घेतले. वॉल्ट डिस्ने हे त्यांचे प्रेरणास्थान आहे.

आपण राजकारणात आलो नसतो तर नक्कीच वॉल्ट डिस्ने स्‍टुडिओसाठी कार्टून केले असते असे ते नेहमी म्हणतात. चित्रपट निर्मिती आणि फोटोग्राफीचीही त्‍यांना आवड आहे. राज यांचा हा गुण त्यांच्‍या मुलातही उतरला आहे. तर चुलत भाऊ उध्‍दव एक चांगला फोटोग्राफर आहे. उध्‍दवचा मुलगा आदित्‍य उत्तम कवी आहे.

मराठीतील प्रख्‍यात अभिनेते मोहन वाघ यांच्‍या कन्‍या शर्मिला यांच्‍याशी राज यांचा विवाह झाल्‍याने तिकडूनही त्यांची कलेशी नाते जोडले गेले आहे.

एक कलावंत अणि व्‍यंगचित्रकार म्हणून महाविद्यालयीन काळात आपल्‍या करीअरकडे पाहणा-या राज यांनी नंतर राजकारणात उडी घेतली. शिवसेनेच्‍या माध्‍यमातून भारतीय विद्यार्थी सेना, शिव उद्योग सेना या संघटनांची बांधणी करणा-या राज यांनी नंतरच्‍या काळात शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेची स्‍थापना केली. मराठीच्‍या मुद्यावरून देशभर रान पेटविणा-या आणि लोकसभा निवडणुकीत राज्यातील तगड्या पक्षांनाही घाम फोडणा-या राज आता राजकारणात पूर्णवेळ बिझी असले तरीही त्यांच्‍यातील कलावंत त्यांनी जपून ठेवला आहे. म्हणूनच आपल्‍या पक्षाची वेबसाईट तयार करताना त्यात एक कप्‍पा व्‍यंगचित्रांसाठी ठेवण्‍यास ते विसरले नाहीत.

राज्यातील स्थिती सुधारायची असेल तर माझ्या हाती (मनसेच्‍या) सत्ता द्या सर्वांना सुतासारखे सरळ करतो सांगणा-या राज यांच्‍या ठाकरी शैलीतील रोखठोक भाषण आणि वादग्रस्‍त विधानांमुळे ही निवडणूक गाजणार हे आधीच निश्चित झाले आहे. त्‍यामुळेच या निवडणुकीत त्‍यांच्‍या पक्षाचे आव्‍हान मोठे असणार आहे, हे नाकारून चालणार नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi