Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इति निळूभाऊ....

इति निळूभाऊ....
NDND
हिंदी चित्रपटसृष्टीसारखे मराठीत संवादांची परंपरा फारशी नाही. पण तरीही काही संवाद त्या व्यक्तिरेखा सादर करणार्‍या कलावतांमुळे अजरामर झाले आहेत. निळू फुले हे त्या कलावंतांपैकी एक. निळूभाऊंची संवादांची शैलीच अशी काही होती, की त्यांच्या साध्या बोलण्यालाही गहन अर्थ यायचा. विशेषतः ते ज्या चित्रपटात खलनायक आहेत, त्यातले अनेक संवाद म्हणूनच आजही सहजी आठवतात. निळूभाऊ त्यांच्या अभिनयाने तर लक्षात रहातातच, पण त्यांच्या संवादातूनही ते आठवतात. म्हणूनच त्यांच्या काही संवादांचे हे संकलन....

निळू फुले शाळामास्तरीणीशी बोलताना खास आवाजात "पण बाई आम्ही काय म्हणतो.."
----
एका चित्रपटात
पोलिस- बलात्कार तुम्हीच केलात का?
फुले- हो
पोलिस-कधी केलात?
फुले-(काहीतरी वेळ सांगतात)
पोलिस-कुठे केलात ती जागा दाखवा.
फुले- साहेब, साखर बेडरुममध्ये खाल्ली काय संडासात खाल्ली काय, गोडच लागते.!!
--
आमच्या घराण्यात गलास फोडल्याचे बारा आणे कधी कुणी भरले नाहीत. पोरानं दारु प्यावी, मास्तराला मारावं, हवालदाराच्या कानफटात ठेऊन द्यावी आन बापानं नायतर आज्यानं सगळं नुसतं करंगळीवर निभाऊन न्यावं....
---
.निळूभाऊ: हे बगा इनिसप्याक्टर...
इन्स्पेक्टरः मांजरेकर!
निळूभाऊ: क्वॉकनातले क्यॅय?
इन्स्पेक्टरः हो!
निळूभाऊ: तर्रीपन ऐकायचं! ते तुमचं काय डायर्‍या, यफाराय, पंचनामा जितं कुटं युवराजांचं नाव असंल तितं काट मारायची......येवड्यासाठी मला शीयेम ना फोन करायला लाऊ नका! ते सोत्ता इथं येतील.
---
बाकी....पोरीला साडीचोळी..ह्ये$$$ आमी करु! आवो खानदानी पध्दतय ती आमची!
----
बाई, अहो आपला स्वतःचा येव्हडा वाडा असताना तुम्ही त्या पडक्यात राहणार ? तुम्हाला तिथे बघुन, आम्हाला हिकडं रातीला झोप यायची नाही.
---
ह्म्म्म. जाधव शीएमला फोन लावा, सांगा आम्ही बोलणारे म्हणाव.
--
निळूभाऊ- मास्तर तुम्ही जेवणार नसला तर आम्ही बी जेवणार नाही.
श्रीराम लागू - आम्ही तुम्हाला आमच्यावर प्रेम करण्याचा हक्क दिलेला नाही.
(सिंहासन)
--
निळुभाउ : मास्तर हे काय सोंग?
लागू : तो आमचा राजमुकुट आहे
(सिंहासन)
---
गावातल्या अनेक लोकांना अजुन २ वेळचं प्र्ण जेवण मिळत न्हाय, उपाशी झोपतात पोरं.
तुम्ही आम्लेट घ्या ...
(सामना)

काय करणार, जुनी खोड, स्वतःलाही सोडलं नाही. नको त्या वेळेला नको ते प्रश्न विचारणारच : इति मास्तर (सामना)
---------
मारुती कांबळेचं काय झालं?" (सामना)
----------
"अरे मास्तरांना दूध भातात साखर घालून दे"(सामना)

(संकलन- साभार मिसळपाव डॉट कॉम)

Share this Story:

Follow Webdunia marathi