Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'अभिनव' सुवर्ण पुत्र

'अभिनव' सुवर्ण पुत्र

वेबदुनिया

, सोमवार, 11 ऑगस्ट 2008 (13:41 IST)
ND
28 सप्‍टेंबर 1983 साली जन्‍मलेला अभिनव बिंद्रा ऑलम्पिकच्‍या इतिहासात 108 वर्षांनंतर देशाला सुवर्ण पदकाचा मान मिळवून देणारा पहिला भारतीय ठरला आहे. एअर रायफल शुटींग प्रकारातील मक्‍तेदार म्‍हणून समजल्‍या जाणा-या 28 वर्ष वयाच्‍या अभिनवकडून संपूर्ण देशाला मोठया अपेक्षा होत्‍या त्‍या त्‍याने सार्थ ठरविल्‍या आहेत.

2000 मध्‍ये झालेल्‍या ऑलम्पिक स्‍पर्धेत सहभागी झालेला तो सर्वांत कमी वयाचा खेळाडू होता. मूळचा चंदीगढ येथील रहिवासी असलेल्‍या अभिवनने 2001 मध्‍ये म्‍युनिच येथे झालेल्‍या
जागतिक करंडक स्‍पर्धेत लहान गटात 597/600 गुणांचा जागतिक विक्रम करीत कांस्‍यपदक पटकाविले होते. त्‍यानंतर 2002 मध्‍ये त्‍याने याच स्‍पर्धेत युगल गटात सुवर्ण तर वैयक्‍तीक गटात चंदेरी पदक मिळविले होते. आजवर अनेक जागतिक स्‍पर्धांमध्‍ये त्‍याने 6 सुवर्णपदकांची कमाई केली आहे. त्‍यामुळे यंदाच्‍या ऑलम्पिक स्‍पर्धेत त्‍याच्‍याकडून भारतीय ऑलम्पिक महासंघाला मोठी अपेक्षा होती ती त्‍याने सार्थ ठरविली आहे.

आपल्‍या खेळाबददल प्रचंड समर्पित असलेल्‍या अभिनवला 2001 सालचा 'राजीव गांधी खेल रत्‍न' हा खेळातील सर्वोच्‍च पुरस्‍कार देउन
webdunia
ND
राष्‍ट्रपतींच्‍या हस्‍ते गौरविण्‍यात आले आहे. 2004 च्‍या एथेन्‍स ऑलम्पिकमध्‍ये अभिनव आपला नैसर्गिक खेळ करीत सर्वांच्‍या स्‍तुतीस पात्र ठरला होता. मात्र त्‍यात त्‍याला पदक मिळविता आले नव्‍हते ती भर त्‍याने आता काढली आहे. 24 जुलै 2006 मध्‍ये झालेल्‍या झाग्रेब येथे झालेल्‍या जागतिक रायफल शुटींग स्‍पर्धेचे विजेतेपद पटकावून त्‍याने या स्‍पर्धेतील पहिला भारतीय जगज्‍जेता ठरण्‍याचा मान पटकाविला होता.

शुटींगमधील अभिनवमधील कौशल्‍य हेरण्‍याचे श्रेय जाते ते ले. कर्नल जे. एस. धिल्‍लन यांनी. ते बिंद्राचे पहिले प्रशिक्षक होते. रायफल शुटर असलेला अभिनवचे एम.बी.ए.पर्यंतचे शिक्षण झाले असून त्‍याच्‍या अभिनव फयुचरिस्‍टीकचा तो मुख्‍य कार्यकारी अधिकारी आहे. 2008 च्‍या बिजींग ऑलम्पिक स्‍पर्धेत वैयक्‍तीक प्रकारात भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून देणारा तो सुवर्ण पुत्र ठरला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi