Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऑलिंपिकच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन

संदीपसिंह सिसोदिया

ऑलिंपिकच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन

वेबदुनिया

दहशतवादापासून ऑलिंपिक गावाला सुरक्षित राखण्यासाठी या भागात स्नीफर डॉग्स, टेहळणी हेलीकॉप्टर, आणि बिजींगमधील महत्त्वाच्या इमारतींना एँटी एअर क्राफ्ट बॅटरी बसवण्यात आल्या आहेत.      
बिजींग ऑलिंपिक तसे गाजतेय ते तिबेटी नागरिकांनी केलेल्या विरोधाने. परंतु आता यात आणखी एक भर पडली आहे, ती अमेरिका आणि चीनच्या द्वेषाची. या खेळात आता शस्त्रास्त्र आणि गुप्तचरांच्या हेरगिरी प्रमाणे शक्तिप्रदर्शन केले जात आहे. ऑलिंपिक हा आता शक्तिप्रदर्शनाचा एक मार्ग बनला आहे.

ऑलिंपिक खेळाच्या माध्यमातून चीन जगाला आपली शक्ती दाखवण्याचाच जणू प्रयत्न करत आहे. बिजींग त्याने अशा काही पद्धतीने सजवले आहे, की विचारता सोय नाही, बिजींगच्या या रोशनाईत न्यूयॉर्कलाही मागे टाकण्याचा चीनचा प्रयत्न असणार आहे.

बिजींगमध्ये ऑलिंपिक घेण्यात यावे यासाठी चीनने आपली जोरदार लॉबिंग मॉस्कोतील ऑलिंपिक समितीपुढे केली होती. 13 जुलै 2001 साली टोरंटो, पॅरिस, इस्तानबुल, ओसाका(जपान) यांना मागे टाकत अखेर चायनाला ऑलिंपिकचे यजमानपद मिळाले.

ऑलिंपिक खेळावर दहशतवादाचे असलेले सावट, आणि तिबेटी नागरिकांच्या जोरदार विरोध प्रदर्शनामुळे बिजींगच नाही तर संपूर्ण चीनलाच एखाद्या लष्करी छावणीचे रूप देण्यात आले आहे.

जागोजागी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. नवीन येणाऱ्या जाणाऱ्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
  पश्चिमी देश माओत्से तुंगच्या या चीनला गरीब आणि मागास देश मानतात, त्यांचे मतपरिवर्तन करण्यासाठी या स्पर्धेतील पदक तालिकेत आपला लाल बावटा जागोजाग फडकवण्याचा प्रयत्न चीन करेल यात शंकाच नाही.      


दहशतवादापासून ऑलिंपिक गावाला सुरक्षित राखण्यासाठी या भागात स्नीफर डॉग्स, टेहळणी हेलीकॉप्टर, आणि बिजींगमधील महत्त्वाच्या इमारतींना एँटी एअर क्राफ्ट बॅटरी बसवण्यात आल्या आहेत.

सुरक्षीतेचे इतके व्यापक उपाय केले जात आहेत, की, या भागात चिनी लष्करातील रेड कॉप तैनात करण्यात आले आहेत. त्यांना खास प्रशिक्षण देण्यात आले आहे.

अत्याधुनिक कंट्रोलरुमच्या माध्यमातून संपूर्ण बिजींगच्या हालचाली टिपल्या जात आहेत. शहरात जागोजाग सीसी टीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. प्रत्येक हॉटेलची कसून तपासणी केली जात आहे.

बिजींगमधील महत्त्वाच्या मेट्रो रेल्वेचेही रूप पालटण्यात आले असून, प्रवाशांची गर्दी लक्षात घेत अशी काही व्यवस्था प्रत्येक स्टेशनवर करण्यात आली आहे, की प्रवासी कितीही आले, तरी रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होणार नाही. गाड्यांतून उतरण्यासाठी आणि गाडीत चढण्यासाठीचे मार्ग बदलण्यात आले आहेत. प्रत्येक रेल्वे स्थानकावर क्लोज सर्किट कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

दरम्यान चीनमधील वैज्ञानिकांनी कॅमेऱ्याचे असे एक सॉफ्टवेअर तयार केले आहे, की जे एखाद्या ठिकाणी पडलेल्या अनोळखी वस्तूला ओळखून याची माहिती कंट्रोल रूमकडे देते. हे सॉफ्टवेअर इतके प्रगत आहे, की वेळ पडली तर ते पोलिसांना संशयिताशी दोनहात करण्यासहही मदत करते.

अनेक भाषांचे ज्ञान या सॉफ्टवेअरला असल्याने त्या भाषेत दिलेल्या शिव्या आणि त्या भाषेतील संभाषणाचे भाषांतरही ते करू शकते.

मोबाईल कंपन्याही यात अग्रेसर आहेत. त्यांनी अशा प्रकारची एक चीप तयार केली आहे, की ही चीप लावली असता कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रिकला उपकरण टीव्हीत परिवर्तित होते.

ऑलिंपिक पदतालिकेत आपलाच दबदबा असावा यासाठी चीनने आपल्या खेळाडूंना खास सुविधा देऊ केल्या आहेत. यात त्यांना देण्यात येणाऱ्या जेवणा पासून ते त्यांच्या कपड्यांचाही बारीक- सारीक विचार करण्यात आला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi