आता सुवर्णपदकाची आशा
विजेंद्रचा उपांत्य सामना आज
मुक्केबाजीच्या उपांत्य सामन्यात भारताच्या विजेंद्रची आज लढत होत असून क्युबाच्या बलाढ्य अशा एमिविओ कोरियाला जर विजेंद्रने धूळ चरली तर त्याच्याकडून भारतीय क्रीडा प्रेमींना अपेक्षा असेल ती सुवर्ण पदकाची.
एमिविओने दोनवेळा पॅन- अमेरिकन स्पर्धा जिंकली आहे, त्यामुळे त्याला कमी लेखून चालणार नसल्याने विजेंद्रला आता आपल्या चालींमध्ये बदल करावा लागणार आहे.
उपांत्य सामन्यात विजेंद्रचा उत्साहही द्विगुणित झाला असून, मी केवळ आता सुवर्णपदकासाठी खेळणार असल्याचा विश्वास त्याने व्यक्त केल्याने भारतीयांच्या आशा आणखी उंचावल्या आहेत.
भारतीय वेळेनुसार विजेंद्रचा दुपारी 12 वाजून 45 मिनिटांनी सामना होत असून, यासाठी विजेंद्रचे गावकरीही सज्ज झालेत.