Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

थ्येन चौक ऑलिंपिक ज्योतीने उजळून गेला

थ्येन चौक ऑलिंपिक ज्योतीने उजळून गेला

वार्ता

तिबेटी नागरिक आणि मानवाधिकार संघटनांच्या विरोधाला जुमानत काल बिजींगच्या थ्येन चौक ऑलिंपिक ज्योतीच्या तेजाने उजळून निघाला. या प्रसंगी उपस्थितीतांनी ऑलिंपिक आणि चीनच्या विजयाच्या घोषणा दिल्या.

205 देश आणि 10500 हून अधिक विविध देशांचे प्रतिनिधी सध्या बिजींगमध्ये डेरे दाखल झाले आहेत. आता या साऱ्यांना उत्कंठा लागली आहे, ती ऑलिंपिक खेळाची.

आपले मनपसंत खेळाडू प्रत्यक्षात पाहायला मिळणार असल्याने बिजींगवासीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही. ऑलिंपिकचा प्रत्येक क्षण आपल्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असल्याचे ते म्हणत आहेत.

बिजींगमध्ये आलेल्या प्रत्येक खेळाडूंचेही बिजींगची भव्यता पाहून डोळ्याचे पाराने फिटले आहे. एका नवविवाहितेप्रमाणे बिजींगला सजवण्यात आले आहे. आज बिजींगमध्ये फुटबॉलचे तारे प्रत्यक्षात अवतरणार आहेत.

बिजींगमधील ऑलिंपिक गावालाही भरपूर सजवण्यात आले असून, येथे उपस्थित नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. नागरिकांनी काल ज्योतीचे स्वागत करताना चीनच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा दिल्या, तर दुसरीकडे तिबेटी नागरिकांच्या समर्थनार्थ काही विदेशी नागरिकांनी येथील चौकात विरोध प्रदर्शने केली.

त्यांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांना लवकरच सोडण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. भारताचा चमूही बिजींगमध्ये पोहचला असून, भारतीय संघाकडून पदकाची अपेक्षा केली जात आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi