Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नौकानायन चमूचे पहिल्या दहाचे लक्ष्य

नौकानायन चमूचे पहिल्या दहाचे लक्ष्य

भाषा

नवी दिल्ली, , शुक्रवार, 8 ऑगस्ट 2008 (14:39 IST)
नवी दिल्ली- भारतीय नौकानयन संघाने बीजिंगमध्ये होत असलेल्या ऑलिम्पिकमध्ये चीन, न्यूझीलंड, ब्रिटन, जर्मनी व ऑस्ट्रेलियासमोर पदक मिळविण्याची आशा सोडली आहे. मात्र, सर्वश्रेष्ठ दहा जणांमध्ये पोहचण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

प्रात्याक्षिकासाठी आधारभूत असलेल्या सुविधा व आर्थिक परिस्थिती लक्षात घेता भारताचे बीजिंग ऑलिम्पिकमध्ये नौकानायनचे केवळ तीन स्पर्धकच जाऊ शकले आहेत. राजपुताना रायफल्सचे बजरंगलाल तखार खुल्या एकेरी स्पर्धेत तर देविंदर कुमार व मंजीत सिंग लाइटवेट डबल्स व एकेरी अशा स्पर्धांमध्ये सहभागी होतील.

बीजिंगमध्ये असलेल्या प्रदूषणाने त्यांच्यासमोर अनेक अडचणी उभ्या राहतील. प्रदुषित पाण्यात नौकाची गती संथ होते व त्यांना पुढे नेण्यात खुप मेहनत घ्यावी लागते. बीजिंगमधील परिस्थिती लक्षात घेता भारतीय नौकानायन चमू ऑलिम्पिक सुरू होण्याच्या 30 दिवस आधी म्हणजे नऊ जुलैलाच पोहचला होता.

बीजिंगमध्ये नौकानायनची 14 स्पर्धा होतील. स्पर्धां 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान शुन्य इंटरनेशनल रोइंग पार्कमध्ये आयोजित केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा सर्वच 14 स्पर्धांमध्ये सहभाग आहे तर जर्मनी 13 व यजमान चीन 11 स्पर्धांमध्ये भाग घेणार आहे.

2006 मध्ये झालेल्या दोहा एशियाई खेळात भारताला नौकानायनमध्ये पहिले रजत पदक मिळवून देणार्‍या 26 वर्षाच्या बजरंगने बीजिंगला रवाना होण्याआधी सांगितले, की ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करायला मिळत असल्याने मी खुश आहे. पदक मिळविण्यासंदर्भात आता सांगणे कठीण आहे. मात्र जास्तीत जास्त चांगल्या कामगिरीची आशा त्याने व्यक्त केली.

बजरंगने गेल्या वर्षी कोरियामध्ये झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक प्राप्‍त केले होते. शाघायमध्ये झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळविल्यानंतरच बीजिंग ऑलिम्पिकसाठी त्याची निवड झाली. एकेरी (2000 मीटर) फेरीत त्याच्या नावावर सात मिनिट सहा सेकंदांचा राष्ट्रीय रेकॉर्ड आहे.

यंदा भारताने नौकानायन विश्व करंडकात कांस्य पदक प्राप्‍त केले आहे. भारतीय नौकानायन महासंघाचे अध्यक्ष सी.पी. सिंग यांनी सांगितले, की बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारतीय नौकानायन चमूला चांगली संधी आहे. गेल्या एथेंस व सिडनी ऑलिम्पिकमध्ये केवळ एकाच स्पर्धेत सहभागी होता आले होते.

या स्पर्धेतील दुसरा स्पर्धक देविंदरने सर्वश्रेष्ठ दहामध्ये येण्यासाठी मेहनत घेऊ, असे सांगितले. 20 वर्षाच्या मंजीतने शांघायमध्ये सहा मिनिट 50 सेकंदात रजत पदक जिंकून त्यात भारताचे स्थान निश्चित केले होते. हैदराबादमध्ये झालेल्या सराव शिबिरात त्याने केवळ सहा मिनिट 35 सेकंदांचा वेळ घेतला होता.

चंडीगडमधील मंजीत ऑलिम्पिकमध्ये निवड झालेला पहिला गैरसैनिकी भारतीय खेळाडू आहे. मंजीतने सांगितले की, बीजिंगमध्ये त्याने सहा मिनिट 20.25 सेकंदाचा अवधी घेतला तर तो लगेच पहिल्या दहामध्ये पोहचू शकेल.

द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्‍त केलेले भारतीय चमुचे कोच इस्माइल बेग यांनी नौकानायन या खेळाला मिळणारा फंड हा खेळाच्या मानाने खूपच कमी आहे, असे सांगितले. नौकानायन हा एक महाग खेळ आहे. या खेळात पेशांसोबत आत्मविश्वासाची देखील गरज भासत असते. भारत सरकारकडून नौकानायन चमुसाठी खूप अपेक्षा आहेत. मात्र त्या वेळेत पूर्ण होत नसल्याची खंत ही इस्माइल बेग यांनी खंत व्यक्त केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi