Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फेल्प्सचा ऑलम्पिकमध्‍ये इतिहास

फेल्प्सचा ऑलम्पिकमध्‍ये इतिहास

वार्ता

बिजींग , रविवार, 17 ऑगस्ट 2008 (14:45 IST)
PTI
बिजींग ऑलम्पिकमध्‍ये अनेक विक्रम प्रस्‍थापित करणारा अमेरिकेचा जलतरणपटू मायकल फेल्प्स याने आज इतिहास घडविला आहे. आपल्‍या कारकिर्दीतले 14 वे ऑलम्पिक सुवर्ण पदक मिळवितानाच त्‍याने यंदाच्‍या ऑलम्पिकमध्‍ये 8 वे सुवर्णपदक मिळविले आहे. इथे 4 गूणा 100 मीटर मेडले रिले स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकल्‍यानंतर त्‍याने आपल्‍याच देशातल्‍या मार्क स्पिट्ज याच्‍या नावे असलेला सर्वाधिक सात सुवर्ण पदक जिंकल्‍याचा 36 वर्ष जूना विक्रम मोडीत काढला आहे.

आपल्‍या खेळाच्‍या प्रकारात एक जीवंत दंतकथा ठरलेला 23 वर्षीय फेल्‍प्‍सने ऑलम्पिकमध्‍ये सर्वाधिक सुवर्ण पदक जिंकण्‍याचा विक्रम आपल्‍या नावावचर नोंदविला असून त्‍याने आजवर जिंकलेल्‍या पदकांची संख्‍या 14 झाली आहे.

स्पिट्ज, अमेरिकी एथलीट कार्ल लेव्‍हीस, फिनलॅण्‍डचा धावपटू पावो नूरमी आणि सोवियत जिम्नास्ट लेरीसा लेतीनीना हे आपल्‍या कारकिर्दीत 9 सुवर्ण जिंकू शकले होते.

यापूर्वी स्पिट्जने 1972 च्‍या म्युनिच ऑलम्पिक खेळांमध्‍ये सात सुवर्ण पदक जिंकले होते. बिजींगमध्‍ये फेल्प्सने जेव्‍हा केव्‍हा तरण तलावात उडी घेतली सुवर्ण पदक घेउनच हा खेळाडू बाहेर आला आहे.

विजयानंतर फेल्प्सने सांगितले, की मला सांगता नाही येणार मला कसं वाटतयं ते माझ्या मनात भावनांचे तरंग उठले आहेत. आणि मला सर्वांत आधी माझ्या आईला भेटावस वाटतयं.

Share this Story:

Follow Webdunia marathi