Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बिजींग ऑलम्पिक शानदार समारोप

बिजींग ऑलम्पिक शानदार समारोप

भाषा

बिजींग , सोमवार, 25 ऑगस्ट 2008 (10:20 IST)
खेळातलं कौशल्‍य, प्रतिस्‍पर्ध्‍याला मात देण्‍यासाठी केलेली प्रयत्‍नांची पराकाष्‍ठा आणि मना-मनांतून राष्‍ट्रप्रेमाची उधळण करणा-या 29 व्‍या बिजींग ऑलम्पिकची यशस्‍वी सांगता दि. 24 रोजी रात्री झाली. चीनला खेळांमध्‍ये जागतिक महासत्‍ता म्‍हणून नावारूपाला आणण-या या खेळांच्‍या महाकुंभात चीनने सुमारे 100 पदकांची कमाई करून जागतिक विक्रम प्रस्‍थपित केला आहे.

आता आगामी 2012 साली लंडनमध्‍ये बिजींग शहराचे मेयर गुआओ जिनलोंग यांनी 2012 च्‍या यजमान लंडनचे मेयर बोरिस जॉन्‍सन यांना ऑलम्पिक ध्वज सोपविला. चीनने या ऑलम्पिकचे यशस्‍वी आयोजन करून आपली ताकत जगाला दाखवून दिली.

चीनने 16 दिवसांच्‍या या महाकुंभात सर्वच क्षेत्रात आपले वर्चस्‍व सिध्‍द केले. चीनने 51 सुवर्ण पदकांसह 100 पदकांची कमाई करत अमेरिका आणि रशियाची या क्षेत्रातली मक्‍तदोरी मोडीत काढली आहे.

भारतीयांसाठीही यंदाच्‍या ऑलम्पिकने आशादायी चित्र निर्माण केले असून 1 सुवर्ण पदकासह तीन कांस्‍य आपल्‍या नावे केले आहे. ऑलम्पिकमध्‍ये 302 सुवर्ण पदकांची वाटप झाले त्‍यात अमेरिकेच्‍या मायकल फेल्प्स आणि जमैकाचा धावपटू उसैन बोल्ट यांनी जागतिक विक्रम केला आहे.

गेल्‍या आठ ऑगस्‍टला या खेळांचे ज्‍या शानदार पध्‍दतीने उदघाटन झाले होते. तोच थाट बिजींगच्‍या नेस्ट स्टेडियममध्‍ये समारोपातही पहायला मिळाला. चीनचे राष्ट्रपती हू जिंताओ आणि आंतररराष्ट्रीय ऑलम्पिक समिती (आयओसी) अध्यक्ष जॅक्स रोगे यांनी रंग-बेरंगी वातावरणात बर्ड नेस्ट स्टेडियममध्‍ये प्रवेश केला.

त्‍यानंतर ऑलम्पिकमध्‍ये सहभागी झालेल्‍या 204 देशांच्‍या ध्वजवाहकांनी मैदानात प्रवेश केला. भारतीय तिरंगा वाहून नेण्‍याचा मान बॉक्सिंगमध्‍ये पहिले कांस्‍य पदक मिळविणा-या विजेंद्र कुमारला देण्‍यात आला. समारंभातच ऑलम्पिकमध्‍ये झालेल्‍या शेवटच्‍या स्‍पर्धेचे पदक वितरण करण्‍यात आले.

आयोजन समितीचे अध्यक्ष लियु कुई आणि रोगे यांनी ऑलम्पिक ध्वज फडकाविला. शेवटी ऑलम्पिकची मशाल विझविण्‍यात आली. आतिशबाजीने बिजींगच्‍या आकाशात जोरदार रोषणाई झाली.

Share this Story:

Follow Webdunia marathi