Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राजीव तोमर कुस्‍तीत पराभूत

राजीव तोमर कुस्‍तीत पराभूत

वार्ता

बिजींग , गुरूवार, 21 ऑगस्ट 2008 (16:56 IST)
फ्रीस्टाइल कुस्‍ती स्पर्धेच्‍या 120 किलो वजन गटात पहिल्‍या फेरीतच राजीव तोमर अमेरिकेच्‍या स्टीव मोकोकडून एकतर्फी पराभूत झाला आहे. त्‍यामुळे त्‍याचे आव्‍हान संपुष्‍टात आले आहे.

राजीवला आपल्‍या अमेर‍िकन प्रतिस्‍पर्ध्‍यांच्‍या डावपेचांमध्‍ये असा जखडला की त्‍याला एकही गूण मिळविता न आल्‍याने तो 0-4 ने पराभूत झाला. सामन्‍याच्‍या सुरुवातीपासूनच राजीव दबावात होता. तर मोकोने सुरुवातीपासूनच आक्रमक रूप धारण केले होते. राजीवचा बचावात्‍मक पवित्रा पाहून अमेरीकेच्‍या पैलवानाने सहज विजय मिळविला. राजीवच्‍या खेळामुळे त्‍याला प्रशिक्षक पी.आर. सोंधी यांनी राजीवला फटकारलेही.

Share this Story:

Follow Webdunia marathi