भारताचा अनुभवी टेनिस खेळाडू अचंता शरत कमलने पुरुष एकेरी स्पर्धेत स्पेनच्या अलफ्रेडो कार्नेरोसचा 4-2 असा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केल्याने आता टेबल टेनिसमध्ये पदकाच्या आशा निर्माण झाली आहे.
कार्नेरोस सोबत अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात शरतने त्याला धूळ चारली. पेंकिंग जिम्नॅशियम मैदानात खेळलेल्या या सामन्यात शरतने कार्नेरोसचा पराभव केला. यापूर्वी मेलबर्न येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत शरतने भारताकडून सुवर्णपदक जिंकले आहे.
शरतने दुहेरी सामन्यात विजय संपादन केल्यास त्याचा सामना चीनच्या प्रसिद्ध खेळाडू हाओ वांग याच्याशी होणार आहे.