बिजींग ऑलिंपिकच्या उद्घाटन सोहळ्या दरम्यान ध्वजवाहकपदाची जबाबदारी अमेरिकेने एका सुदानी शरणार्थीला दिली आहे. लोपेज लोमोंग असे त्याचे नाव आहे. 1500 मीटरमध्ये धावपट्टू असलेल्या लोपेजला प्रथमच हा बहुमान देण्यात आला आहे.
1919 साली दक्षिण सुदान भागात झालेल्या उद्रेकात लोपेच आपल्या आई-वडिलांपासून वेगळा झाला होता. आणि यानंतर तो अमेरिकेत चालला गेला.
2007मध्ये त्याला अमेरिकेचे नागरिकत्व देण्यात आले. आपल्या आयुष्यातील हा सर्वोच्च आनंदाचा क्षण असल्याचे मत यानंतर लोपेज याने व्यक्त केले आहे.