ऑलिंपिकची धामधूम संपल्यानंतर आता चीनने या स्पर्धेतील अनेक वस्तूंची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. यात बास्केटबॉल खेळाडू याओ मिंग याच्या बिछान्या सोबतच इतर काही वस्तूंची निलामी करण्यात येणार आहे.
चीनच्या सरकारी संकेतस्थळाने याची माहिती दिली असून यात सामान्य माणसालाही सहभागी करून घेण्यात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
ऑलिंपिक उद्घाटन समारोहात उपयोगात आणण्यात आलेल्या विविध वस्तूंचाही समावेश या निलामीत करण्यात आला आहे.