Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऑलिंपिकमध्येही सानियावर संकट

ऑलिंपिकमध्येही सानियावर संकट

वार्ता

काही दिवसांपासून संकटात सापडलेली सानिया बिजींग ऑलिंपिकमध्येही अडचणीत आली आहे. तिची जागतिक क्रमवारी घसरत असतानाच आता ऑलिंपिकसाठी काढण्यात आलेल्या ड्रॉमध्ये तिला कठिण ड्रॉ निघाला असून, तिला आता जागतिक क्रमवारीत 56 क्रमांकावर असलेल्या चेक गणराज्याच्या इवेता बेनसोवाशी दोनहात करावे लागणार आहेत.

दुसरीकडे जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या महेश भूपती आणि लिएंडर पेस यांना मात्र प्रवेशासाठी फारसे प्रयत्न करावे लागणार नाहीत.

महिला एकेरीत सानिया चमकदार खेळ करेल अशी आशा तिच्या चाहत्यांना आहे. परंतु आता पहिल्या फेरीपूर्वीच तिला इवेनाशी झुंजावे लागणार असल्याने या सामन्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सानियाला ऑलिंपिक विजयाचे आपले स्वप्न पूर्णं करायचे असेल तर तिला या सामन्या विजय मिळवावाच लागणार आहे. दुसऱ्या फेरीत ति यशस्वी ठरली तर तिला सीडनीत विजय मिळवणाऱ्या व्हिनस विल्यमशी लढत द्यावी लागणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi