Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टेनिस एकेरीचे सुवर्ण व रौप्यही रशियाकडेच

टेनिस एकेरीचे सुवर्ण व रौप्यही रशियाकडेच

वार्ता

बीजिंग , शनिवार, 16 ऑगस्ट 2008 (19:58 IST)
दिनारा साफिना व एलेना दिमेंतिएव्हा यांनी ऑलिंपिकमध्ये आज महिलांच्या टेनिस एकेरीत अंतिम फेरीत धडक मारून सुवर्ण व रौप्य पदकही रशियाकडेच राहिल याची काळजी घेतली. त्याचवेळी दुहेरीत अमेरिकेच्या व्हिनस व सेरेना विल्यम्स या बहिणी अंतिम फेरीत पोहोचल्या आहेत.

साफिनाने चीनच्या लि ना को हिला ७-६, ७-५ असे हरविले. त्यावेळी दिमेंतिएव्हाने आपल्याचा देशाच्या वेरा जवोनारेवाला ६-५, ७-६ अशी मात दिली.

आता अंतिम फेरीत साफिना व दिमेंतिएव्हा परस्परांशी लढतील.

पुरूष एकेरीत स्पेनचा राफेल नदाल व चिलीचा फर्नांडो गोंजालेझ यांच्यात रविवारी अंतिम सामना होईल. पुरूष एकेरीचे कास्य पदक आज सर्बियाच्या नोवाक जोकोविचला मिळाले. पुरूष दुहेरीत अमेरिकेच्या ब्राब ब्रायन व माईक ब्रायन या जोडीला कास्य पदक मिळाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi