वेटलिफ्टर मोनिका देवीच्या चाचणीत जरी ति अपयशी ठरली असली तरी, यात राजकारण करण्यात येत असल्याचा आरोप तिने केल्याने तिची पुन्हा एकदा चाचणी करण्याची मागणी करत तिच्या डोप टेस्टवर मणिपुरचे मुख्यमंत्री ओ इबोबी सिंह आणि भालाफेक संघाने शंका व्यक्त केली आहे.
मोनिकाची पुन्हा एकदा डोप चाचणी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली असून, ति निर्दोष असल्यास तिला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आपण स्वतः: करणार असल्याचे इबोबी यांनी स्पष्ट केले आहे.
ऑलिंपिकला रवाना होण्यापूर्वी करण्यात आलेल्या डोपींग चाचणीत मोनिका अयशस्वी ठरली होती. यानंतर तिला न नेण्याचा निर्णय घेण्यात आला. आपल्याला या प्रकरणा गोवण्यात आल्याचा आरोप करत तिने आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.