अंजली भागवत आणि अवनीत कौर यांनी भारतीय क्रीडा प्रेमींची निराशा केल्यानंतर भारताच्या नेमबाजीतल्या उरल्या सुरल्या आशाही आज अखेर धुळीस मिळाल्या.
गगन नारंग आणि संजीव राजपूत यांच्याकडूनही भारतीयांना केवळ निराशाच हाती आली. 50 मीटर राईफल स्पर्धेच्या प्रवेश फेरीत या दोनही खेळाडूंनी खराब कामगिरी केल्याने दोघेही ऑलिंपिकमधून बाहेर फेकले गेले.
संजवी 591 अंक मिळवत तो 26 स्थानावर तर गगन नारंग 589 अंक मिळवत 35 स्थानावर होते. दहा मीटरच्या फायनलमध्ये जवळपास स्थान निश्चित मानले गेलेल्या नारंगने अखेरीस खराब खेळ केल्याने काऊंटबॅकवर त्याला हार पत्करावी लागली.