पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारत आणि अर्जेंटिना यांच्यातील पूल ब सामना अंतिम शिटीपर्यंत 1-1 असा बरोबरीत संपला. अर्जेंटिनाने दुसऱ्या क्वार्टरमध्ये गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली आणि भारतीय संघ बराच वेळ बरोबरी मिळविण्यासाठी झगडत होता. अखेरच्या क्षणी कर्णधार हरमनप्रीत सिंगने भारताला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर गोल करत संघाला बरोबरी साधून दिली. हरमनप्रीतचा हा गोल अत्यंत महत्त्वाचा ठरला आणि सामना गमावण्यापासून संघ वाचला. भारतीय संघाने यापूर्वी न्यूझीलंडचा पराभव केला होता आणि आता मंगळवारी आयर्लंडशी सामना होणार आहे.
भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगने 59व्या मिनिटाला गोल करत भारताला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरचे रुपांतर करण्यात कोणतीही चूक केली नाही आणि ड्रॅग फ्लिकद्वारे महत्त्वपूर्ण गोल केला.