पॅरिस ऑलिम्पिक 2024 ची लढाई शेवटच्या दिशेने सरकली आहे. 26 जुलै रोजी उद्घाटन समारंभाने सुरू झालेल्या ऑलिम्पिक खेळांचा समारोप सोहळा 12 ऑगस्ट रोजी होणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दहा हजारांहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. भारतातून एकूण 117 खेळाडूंनी सहभाग घेतला आणि एकूण 6 पदके जिंकली. पॅरिस ऑलिम्पिकचा समारोप सोहळा स्टेड डी फ्रान्स स्टेडियमवर होणार आहे. या कार्यक्रमाला 'रेकॉर्ड्स' असे नाव देण्यात आले असून फ्रेंच थिएटर डायरेक्टर आणि अभिनेता थॉमस जोली हे सर्व ऑपरेशन्सची देखरेख करतील.
समारोप समारंभ ऑलिम्पिक मशाल विझवून कार्यक्रमाची सुरुवात होईल. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे प्रमुख थॉमस बाख आणि आयोजन समितीचे अध्यक्ष टोनी एस्टँग्युएट यांची भाषणे होणार आहेत. भारतीय वेळेनुसार (सोमवार) दुपारी 12:30 वाजता समारोप सोहळा सुरू होईल. हा कार्यक्रम दोन तास तीस मिनिटे चालणार आहे.
यंदाचा पॅरिस ऑलम्पिक समापन सोहळा फ्रान्समधील मोठ्या स्टेडियमवर स्टेड फ्री येथे होणार असून या स्टेडियम मध्ये एकाच वेळी 80 हजार प्रेक्षक बसू शकतात.
उदघाटन समारंभात पी.व्ही सिंधू आणि शरत कमल हे भारताकडून ध्वजवाहक होते. तर आता समारोप समारंभात मनू भाकर आणि हॉकी संघाचा गोलरक्षक पीआर श्रीजेश हे भारतीय संघाचे ध्वजवाहक असतील. युवा नेमबाज मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत दोन कांस्यपदके जिंकून इतिहास रचला आहे. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती भारताची पहिली महिला खेळाडू आहे. पीआर श्रीजेशने भारतीय हॉकी संघाला कांस्यपदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे