Article Oscar Awards Marathi %e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%ae%e0%a4%a1%e0%a5%89%e0%a4%97 %e0%a4%91%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%9a%e0%a4%be %e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ac%e0%a4%b3 %e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b0 109020200072_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'स्लमडॉग' ऑस्करचा प्रबळ दावेदार

स्लमडॉग  ऑस्करचा प्रबळ दावेदार
IFM
दक्षिण आफ्रिकेत भारताचे उप उच्चायुक्त असलेल्या विकास स्वरूप यांच्या क्यु अँड ए या कादंबरीवर आधारीत स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटाने इतिहास घडविला आहे. गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाल्यानंतर आता चर्चा सुरू झालीय ती त्याला ऑस्कर मिळेल का याची.

मुंबईच्या झोपडपट्टीत रहाणारा एक मुलगा करोडपती बनविणाऱ्या एका स्पर्धेत भाग घेतो आणि ती जिंकतो, असे या चित्रपटाचे कथासूत्र आहे. गोल्डन ग्लोब मिळाल्यानंतर आता त्याला ऑस्कर मिळेल का याविषयी अनेकांनी आपली मते व्यक्त केली आहेत.

हॉलीवूडचा प्रसिद्ध चित्रप निर्माता डॅनी बॉयल यांनी या चित्रपटाची तुलना अमेरिकेत ओबामा यांच्या निवडीने आलेल्या बदलाशी केलेली आहे. ब्रिटनमधील नामवंत प्रकाशक विल्यम हिल यांनी ऑस्करच्या शर्यतीत हा चित्रपट पुढे असल्याचे सांगून त्याला चार गुण दिले आहेत.

या प्रकाशकाने या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, केट विन्सलेटला रिव्होलुशनरी रोड या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री व डार्कनाईटमध्ये दमदार अभिनयासाठी दिवंगत अभिनेता हिथलेगला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे ऑस्कर मिळेल असा दावा केला आहे. हाऊस पेडी पॉवर या अन्य एका प्रकाशन संस्थेने या चित्रपटालाच नव्हे तर त्याचे दिग्दर्शक बोयल यांनाही सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे ऑस्कर मिळण्याचा दावा केला आहे.

webdunia
IFM
गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळण्यापूर्वीच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालला होता. असे असतानाच त्याला ग्लोब पुरस्कार मिळाल्याने आता ऑस्कर मिळण्याची शक्यता वाढलीय असे एका प्रकाशकाच्या प्रवक्त्याने सांगितले.

दरम्यान, या कादंबरीचे लेखक स्वरूप भलतेच भारावलेले आहेत. या कादंबरीवर इतका चांगला चित्रपट बनेल आणि तो गोल्डन ग्लोब जिंकून ऑस्करच्या शर्यतीतही सहभागी होईल, याचा कधी विचारही केला नव्हता, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. सध्या स्वरूप विविध प्रसारमाध्यमांना मुलाखती देण्यात व्यस्त आहेत.

पण या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते गोल्डन ग्लोब मिळालेल्या चित्रपटांना ऑस्कर मिळण्याची शक्यता साठ टक्के असते. त्यामुळेच या चित्रपटाला ऑस्कर मिळण्याची शक्यता वाढलेली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi