पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी महिला आरूढ होऊ शकते, असे संकेत पाकिस्तान पीपल्स पक्षाचे सहअध्यक्ष असफि अली झरदारी यांनी दिले आहे. मात्र सत्ताधारी आघाडीत सहमतीनंतरच अंतिम निर्णय होईल, असे सांगून स्वत: शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले.
मुशर्रफ पायउतार झाल्यानंतर व्यवस्था, राष्ट्रीय राजकारभार व परराष्ट्रधोरणातही बदलाचे संकेत देताना प्रादेशिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी भारत, अफगाणिस्तान, इराण व अरब देशांची परिषद घेण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला.
मुशर्रफ सत्ताधारी आघाडी सरकारविरूद्ध कटकारस्थान करत असल्याच्या अहवालानंतर त्यांच्यावर महाभियोग भरण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.