Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सैन्यदलातील ‘एसएसबी’ मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी 3 नोव्हेंबरपासून प्रशिक्षण

सैन्यदलातील ‘एसएसबी’ मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी 3 नोव्हेंबरपासून प्रशिक्षण
, गुरूवार, 6 ऑक्टोबर 2016 (12:02 IST)
येत्या 27 ऑक्टोबरला नाशिकरोडला मुलाखती
सैन्यदलांमध्ये  अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या आणि कंबाईण्ड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या युवक-युवतींना “एसएसबी” (सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड) या मुलाखतीबाबत प्रशिक्षण देणारे सत्र नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात 3 नोव्हेंबर  पासून सुरु होणार आहे. प्रशिक्षण वर्गातील प्रवेशासाठी 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता मुलाखत घेण्यात येणार आहे.
 
भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी पात्र उमेदवारांसाठी हा एसएसबी प्रशिक्षण वर्ग ठेवण्यात आलेला असून त्यासाठी सैन्य दलातील तज्ञ अधिका-यांकडून प्रशिक्षण मिळणार आहे. कंम्बाईंड डिफेन्स सर्व्हिसेस या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या व स्पेशल एंट्रीद्वारे सैन्य दलात अधिकारी होऊ इच्छिणा-या तसेच ज्या महाराष्ट्रीयन नवयुवक व युवतींना सशस्त्र सैन्य दला कडून एस.एस.बी.परिक्षेची मुलाखत पत्रे मिळण्याची शाश्वती आहे अशा उमेदवारांना सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीच्या पूर्व तयारीसाठी महाराष्ट्र शासनामार्फत छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र,विभागीय आयुक्त कार्यालय परिसर,नाशिकरोड,नाशिक येथे प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येणार आहे. प्रशिक्षण कोर्सचा कालावधी3 नोव्हेंबर  ते 12 नोव्हेंबर,2016 (एकूण 10 दिवस)असा आहे. प्रशिक्षण कालावधीत निवासाची,प्रशिक्षणाची व भोजनाची सोय विनामूल्य करण्यात आलेली आहे.
 
इच्छुक व पात्र उमेदवारांनी प्रशिक्षण वर्गात प्रवेश मिळण्यासाठी 27 ऑक्टोबर,2016 रोजी सकाळी 10.30 वाजता छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय आयुक्त कार्यालय परिसर,नाशिक रोड, नाशिक येथे (खालील प्रमाणे पात्रता धारण करीत असतील अशाच उमेदवारांनी) शैक्षणिक प्रमाणपत्र व गुणपत्रिकेच्या मुळ प्रतींसह मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येण्या आधी PCTC Training च्या Google Plus पेजवर किंवा सैनिक कल्याण विभाग,पुणे यांची वेबसाईट www.mahasainik.com वरील Recruitment Tab ला क्लीक करुन त्या मधील उपलब्ध Check list आणि महत्वाच्या तारखा यांचे अवलोकन करुन त्याची दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून तसेच त्यामध्ये दिलेले सर्व परिशिष्ट डाऊन लोड करुन त्याचीही दोन प्रती मध्ये प्रिंट काढून ते पूर्ण भरुन घेऊन यावे. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 0253-2451031 व2451032 वर कार्यालयीन वेळेत(सकाळी 10.00 ते सायं 05.30) संपर्क साधावा. 
 
एस.एस.बी. प्रवेश वर्गासाठीची खालील प्रमाणे कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व या संबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येतांना घेऊन येणे आवश्यक आहे:-
1)  कंम्बाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (UPSC)अथवा नॅशनल डिफेंस एक्झामिनेशन (UPSC)पास झालेली असावी. व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे.
2)  एनसीसी(सी) सर्टिफिकेट अे/बी ग्रेड मध्ये पास झालेले असावे व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबी साठी शिफारस केलेली असावी.
3)  टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे.
4)  युनिव्हर्सिटी एन्ट्री स्किमसाठी एसएसबी कॉल लेटर आलेले असावे अथवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे. या प्रशिक्षण वर्गाचा जास्तीत जास्त पात्र महाराष्ट्रीयन तरुण/तरुणींनी लाभ घ्यावा असे मा.संचालक,सैनिक कल्याण विभाग,महाराष्ट्र राज्य,पुणे आणि प्रभारी अधिकारी,छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र,नाशिकरोड,नाशिक यांनी आवाहन केले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हाय 'बी पी'ला ला नियंत्रणात करते वेलची