Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अपंग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

अपंग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

वेबदुनिया

PR
केंद्रसरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयांतर्गत कार्यरत असणार्‍या राष्ट्रीय अपंग वित्तीय साहाय्यता संस्थेद्वारा खास अपंग विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या विशेष शिष्यवृत्तींसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थी/उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत :

योजनेचा तपशील व शिष्यवृत्तींची संख्या :
या योजनेअंतर्गत अपंग विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवी व पदच्युत्तर शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी विशेष शिष्यवृत्ती देण्यात येतात व अशा शिष्यवृत्तींची संख्या 1000 आहे.

आवश्यक पात्रता :
योजनेअंतर्गत अर्ज करणार्‍या अर्जदार विद्यार्थ्याने पदवी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती घेण्यासाठी 10,12 शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी बारावीची परीक्षा, तर पदच्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती घेण्यासाठी पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवारांनी अन्य कुठल्याही शिष्यवृ्ती योजनेचा लाभ घेतलेला नसावा व त्यांचा कुटुंबाचे वार्षिक एकत्रिच उत्पन्न 3 लाखांहून अधिक नसावे.

निवड प्रक्रिया :
अर्जदारांपैकी पात्रताधारक अपंग उमेदवारांमधून या योजनेअंतर्गत उमेदवारांची निवड करण्यात येईल.

शिष्यवृत्तीचा तपशील : ‍
निवड झालेल्या विद्यार्थी/उमेदवारांना खालीलप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येईल. पदवी अभ्यासक्रमासाठी दरमहा 2500 रु, तर पदच्युत्तर अभ्यासक्रमासाठी दरमहा 3000 रु. शैक्षणिक शुल्क म्हणून त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या 10 महिने कालावधीसाठी.

पुस्तके व शैक्षरिक संदर्भ साहित्य खरेदीसाठी पदवी अभ्यासक्रमासाठी 6000 रु. तर पदच्युत्तर अभ्यासक्रमासाठी 10,000रु. प्रती शैक्षणिक वर्षासाठी याशिवाय उमेदवारांच्या वैयक्तिक वैद्यकीय गरजांनुसार त्यांना वैद्यकीय साधन/उपकणांसाठी पण आर्थिक मदत देण्यात येईल.

विशेष सूचना :
वरील योजनेअंतर्गत पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यासाठी विशिष्ट अंतिम तारीख नसून योजनेअंतर्गत पात्रताधारक उमेदवार वर्षभरात केव्हाही अर्ज करू शकतात.

अधिक माहितीसाठी संपर्क :
या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी नॅशनल हँडिकॅप्ड फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या www.nhfdc.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज पाठवण्याचा पत्ता :
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज नॅशनल हँडिकॅप्ड फायनांस अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, रेडक्रास भवन, सेक्टर-12, फरिदाबाद 121007 (हरियाणा) या पत्त्यावर पाठवावेत. गरजू अपंग विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसह आपले पदवी व पदच्युत्तर शिक्षण घेण्यासाठी या योजनेचा जरूर विचार करावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi