कोर्सला प्रवेश घेण्यापूर्वी कोर्सचे स्वरूप जाणून घेणे फायाचे आहे.
व्यावसायिक प्रशिक्षणासाठी जाताना जी प्रशिक्षणकेंद्रे नोकरीची हमी देतील अशाच केंद्रांमध्ये जावे. याचे कारण बरेचदा अशा केंद्रांचे काही कंपन्यांशी करार असतात, ज्याअन्वये या प्रशिक्षण केंद्रातून बाहेर पडल्यावर प्रशिक्षणार्थी कुठेही नोकरी करू शकतो. अशी प्रशिक्षण केंद्रे शोधल्यामुळे त्याचा दुप्पट फायदा प्रशिक्षणार्थींना होतो.
नोकरदार व्यक्तींना काम सांभाळून हा कोर्स करणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. अशा वेळी कोर्स करणे आवश्यकच असेल, तर कामाच्या वेळेनंतर तुमच्या आवाक्यात असलेली वेळ निवडावी. कोर्सला जाणे न जमल्यास त्या काळात चुकलेलं प्रशिक्षण भरून काढण्याचीही तयारी हवी.
सध्याच्या स्पर्धेच्या युगात व्यक्तिमत्त्व विकास करणे आवश्यकच आहे. त्यासाठी प्रशिक्षण पुरवणार्या संस्थांचे कामही कौतुकास्पद आहे. पण या संस्थांमध्येही उपयुक्त संस्था कुठल्या हे निवडूनच त्या कोर्ससाठी प्रवेश घ्यावा. आपण त्या कोर्ससाठी आपला वेळ आणि पैसाही खर्च करणार असतो. तिथे आपल्याला काहीतरी मिळेल ही अपेक्षा असते. त्यामुळेच ही काळजी घ्यावी.
आपला कोर्स पूर्ण झाल्यावरही केंद्रांच्या प्रतिक्रियासत्रात सहभाग घ्यावा.