Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इंटरनेट बनला गुरु!

-विधिका गर्ग

इंटरनेट बनला गुरू
WD
WD
आपण 21 व्या शतकात वावरत आहोत. आज विज्ञान, माहिती तंत्रज्ञानाने मोठी उंची गाठली आहे. त्यामुळे 'अशक्य' हा शब्द तर कधीच आपल्या शब्दकोषातून गायब झाला आहे. आज इंटरनेटमुळे सार्‍या जगातील देश एकमेंकाना जोडली गेले आहे. त्यामुळे साध्या साध्या गोष्टीसाठी ही इंटरनेटचा आज वापर केला जात आहे. एखादे वाद्य वाजविणे शिकायचे असेल अथवा एखाद्या पदार्थाची रेसिपी शोधायची असेल तर... इंटरनेट है ना! अनेक प्रकारच्या वेबसाइटस् तयार झाल्या आहेत. जशा की‍ यू-ट्यूब व व्हिडियो जगतातील यासंदर्भात स्टेपवाईस माहिती आपली वाट पहात असते.

आजच्या युवांनी शिक्षणासाठी इंटरनेटला आपले साधन बनविले आहे. तर घरातील गृहीण अधिक सगज असल्याने एखादी स्पेशल डिश तयार करण्‍यासाठी 'रेसिपी बुक' वाचत बसण्या पेक्षा 'नेट वर सर्च' हा चांगला पर्याय निवडला आहे. केवळ माहितीच नाही तर ती रेसिपी कशी केली जाते, हे देखील व्हिडिओच्या माध्यमातून दिसते.

आज इंटरनेटच्या माध्यमातून घर बसल्या प्रत्येक गोष्‍ट आपण शिकू शकतो. 'ग्रंथ हेच गुरू' असे म्हटले जात होते. आता 'इंटरनेट हेच गुरू' म्हणण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात अनेक युवक- युवतींच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता नेट वरून जॉब चटकन मिळतो, मेकअपच्या विविध पध्दती कळाल्या. एवढेच नव्हे तर नेटच्या माध्यमातून नृत्य शिकल्याचे एका तरूणीने सांगितले.

आज नेटचा वापर विविध कामासाठी केला जात आहे. 'गूगल' हे युवापिढीत अधिक लोकप्रिय आहे. इंटरनेटकडे आज ज्ञानाचा भंडार आहे. त्याच्याकडे आज जगातील प्रत्यके प्रश्नाचे उत्तर आहे. यात शंका नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi