1) भरपूर इंग्रजी ऐकावे. प्रामुख्याने इंग्रजी बातम्या लक्षपूर्वक ऐकाव्यात. त्या ऐकताना उच्चार, बोलण्याचा पध्दतीकडे लक्ष द्यावे. आकाशवाणीवर हिंदी, मराठी व इंग्रजी बातम्या लागोपाठ असतात. त्या ऐकाव्या मुळ बातमी माहित असल्याने इंग्रजी समजून घेणे सोपे जाते. 2) इंग्रजी वाचनही आवश्यक आहे. वर्तमान पत्रे, पुस्तके वाचावीत. वाचताना वाक्यरचना, विविध शब्दांच वाक्यांत केलेला वापर नीट पाहावा. वेगवेगळ्या डिक्शनरीज वाचण्यासाठी सवय लावून घ्यावी. 3) कठीण वाटणारे शब्द शब्दकोशात पाहून लिहून ठेवावेत. त्यामध्ये पर्यायी शब्दही मिळतील. त्यांची व इतर महत्त्वाच्या शब्दांची नोंद करून ठेवावी. त्यामुळे शब्द संग्रह वाढण्यास मदत होते. रोज असे किमान तीन शब्द शोधावेत. त्यांचा अर्थ व ते कशा प्रकारे वापरले जातात. त्याचा क्रम बघावा. त्यांचा बोलताना वाक्यात उपयोग करावा. 4) इंग्रजी लिहिण्याचा सराव करणे आवश्यक आहे. दररोज नियमितपणे लिहावे. आपल्या डायरीपासून सुरूवात करता येईल. दिवसभरातील एखाद्या घटनेवर किमान एक परिच्छेद लिहावा. अशा वेळी मराठी शब्दांचा इंग्रजी अर्थ सांगणारी डिक्शनरी वापरावी. 5) इंग्रजी बोलायला सुरूवात करावी. मित्रमंडळींबरोबर. घरच्यांबरोबर इंग्रजीतून बोलण्याचा प्रयत्न करावा. 6) इंग्रजीतून विचार करण्याची सवय लावून घेतली पाहिजे.