Article Personality Development Marathi %e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2 %e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a5%87 %e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a2%e0%a4%a4%e0%a4%be %e0%a4%95%e0%a4%b2 109080300064_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

परदेशातील शिक्षणाकडे वाढता कल

परदेशातील शिक्षणाकडे वाढता कल करियर संधी फॉरेन
ND
ND
परदेशात शिक्षण घेतल्यानंतर डॉलरमधील भल्यामोठ्या पॅकेजची नोकरी कुणाला नाही आवडणार? म्हणूनच भारतीय तरुणांमध्ये परदेशी शिक्षणाची क्रेझ अलीकडच्या काळात वाढलेली आहे. अमेरि‍का, ऑस्‍ट्रेलि‍या, इंग्‍लंड व कॅनडा येथे अनेक भारतीय त्यासाठी गेले आहेत. काही शिक्षण घेऊन परतले आहेत तर काही पैसा कमावण्यासाठी तेथे थांबले आहेत.

प्राक्‍टि‍कलला प्राधान्य-
परदेशात जाऊन इंजीनि‍यरिंग, मेडि‍कल, मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट, आय टी, फाइन आर्ट, आर्कि‍टेक्‍ट, वकिली आदी अभ्यासविषयांमध्ये पदवी प्राप्त करणार्‍यांची संख्या वाढली आहे. परदेशात थिअरीशिवाय प्राक्‍टि‍कल नॉलेजला प्राधान्य दिले जाते.

नोकरीची सुवर्णसंधी-
परदेशातील प्रतिष्ठीत विद्यापीठातून पदवी घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांना परदेशातच काय तर भारतातही नोकरीच्या सुवर्णसंधी सहज उपलब्ध होत असतात. महाराष्‍ट्र, पंजाब व गुजरात राज्यातील मोठ्‍या संख्येने विद्यार्थी परदेशात शिक्षण घेताहेत.

काहीच कठीण नाही!
परदेशातील विद्यापीठात प्रवेश कसा मिळेल? भारताच्या तुलनेत तेथील अभ्यास अधिक कठीन तर नसेल? तसेच तेथील खर्च आपल्याकडून झेपेल काय? असे अनेक प्रश्न परदेशात शिक्षण घेण्‍यास इच्छूक असलेल्या विद्यार्थ्यांच्या मनात घर करत असतात.

प्रवेश परिक्षा उत्तीर्ण करून हावर्ड, ऑक्‍सफोर्ड, केम्ब्रिज, एडि‍नबर्ग, ऑस्‍ट्रेलि‍यन कॅथोलि‍क, स्‍कूल ऑफ ओरिएंटल अ‍ॅण्‍ड आफ्रिकन सारख्या विद्यापिठात प्रवेश म‍िळवता येतो. तसेच टॉफेल, सेट या परीक्षा उत्तीर्ण करून परदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश निश्चीत केला जाऊ शकतो. पैशांचेही आता टेन्शन राहिलेले नाही. आज सर्वच बॅंकाकडून शिक्षणासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi