Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सकारात्मकतेचा मंत्र जपा

सकारात्मकतेचा मंत्र जपा
ND
सकारात्मक आणि नकारात्मक विचारांच्या संदर्भात तुम्ही बरंच काही वाचलं असेल. ऐकलं असेल. तेवढ्या पुरता त्याचा तुमच्या जीवनावर मोठा परिणाम झाला असेल. पण काही काळानंतर ते सगळं हळूहळू डोक्यातून निघून गेलं असेल. याचा अर्थ सकारात्मक विचारांना काहीच अर्थ नाही, असा नसतो. ते विचार योग्यच असतात, पण त्याचे अवलंबन आपल्या जीवनात करण्याचा सकारात्मक विचारच मुळी रूजत नाही. गोची तिथेच आहे.

आपल्याला एखादी वाईट सवय लागलेली असेल तर ती सोडणे आपल्या हातात आहे. दुसरी व्यक्ती ही सवय सोडू शकत नाही. त्याची सुरवात आपल्यालाच करावी लागणार आहे. तसेच सकारात्मक विचारही आपल्यालाच करावा लागणार आहे, त्याची अंमलबजावणीही आपणच केली पाहिजे. यात अशक्य काही नाही. तरच हे विचार कायम आपल्या डोक्यात राहून आपले व्यक्तिमत्व सकारात्मक होऊ शकते.

एक लक्षात ठेवा. तुम्ही जसा विचार करता तसेच तुमचे आयुष्य घडते. तुम्ही चांगला विचार केलात, तर तुमचे आयुष्य चांगले घडेल. पण तुम्ही वाईट विचार केलात तर तुमचे आयुष्यही त्याच मार्गावर वाटचाल करते. थोडक्यात तुम्ही विचार करता तसे अनुभव तुम्हाला येतात. म्हणूनच अनुभव हेच जीवन आहे हे म्हणणे काही अयोग्य नाही.

  सकारात्मकतेचा मंत्र जपा आणि आपल्या सर्व अडचणी, व्याधी, समस्या दूर करा. त्यानंतर बघा, तुम्हाला किती मित्र लाभतात ते.       
थोडा विचार करा. स्वतःच्या पूर्वायुष्याकडे जरा नजर टाका. आयुष्यातील चांगल्या गोष्टी आठवल्यात तर तुमची मनस्थिती चांगली होती. पण जर वाईट गोष्टीच आठवल्या तर तुमची मनस्थितीही तशीच दुःखी होते. एखाद्या घरात तुम्ही घालवलेले चांगले क्षण कधी आठवणार नाहीत, पण दुःखद क्षण नक्की आठवतील. तेच झोपडीत राहिल्यानंतर लक्षात राहिलेले आनंददायी क्षणही लवकर आठवतील.

आपल्या आयुष्यातील नव्वद टक्के समस्या आपल्या नकारात्मक विचारसरणीमुळे उत्पन्न होतात. फक्त दहा टक्के समस्या खरोखर समस्या असतात.

सकारात्मक विचारच आपल्याला प्रफुल्लित ठेवतात. कोणत्याही घटनेविषयी, व्यक्तिविषयी, प्रसंगाविषयी सकारात्मक विचार करा. नकारात्मक विचाराचा परिणामही नकारात्मकच होईल हे लक्षात घ्या. मित्रांबाबतही सकारात्मकच दृष्टिकोन ठेवा. अन्यथा कटूता हाती येईल.

सकारात्मक विचार करायला सुरवात करा आणि मग पहा तुमच्यातच कसे परिवर्तन होते ते. अनेक ग्रंथ, सत्संग आणि उपदेश जे करू शकणार नाही ते तुम्ही तुमच्या विचारांनी करू शकता. सकारात्मकतेचा मंत्र जपा आणि आपल्या सर्व अडचणी, व्याधी, समस्या दूर करा. त्यानंतर बघा, तुम्हाला किती मित्र लाभतात ते.

प्रत्येक जण तुम्हाला भेटण्यास उत्सुक असेल. तुम्ही काहीही म्हणालात की समोरच्या व्यक्तिला तुमचा आदर करावासा वाटेल. प्रत्येक जण तुमच्याशी मैत्री करण्यास उत्सुक असेल. तुमच्या व्यक्तिमत्वाचा दबदबा तयार होईल. म्हणूनच आयुष्यात नेहमी सकारात्मकतेचा मंत्र जपा.

Share this Story:

Follow Webdunia marathi