Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रथमच परदेशात जात असल्यास या देशांना भेट द्या

प्रथमच परदेशात जात असल्यास या देशांना भेट द्या
, मंगळवार, 8 फेब्रुवारी 2022 (21:34 IST)
जर आपण प्रवासाची आवड ठेवता तर देशाबरोबरच परदेशातही प्रवास करणे हे एक स्वप्नच आहे. अशा परिस्थितीत, जरआपण प्रथमच दुसऱ्या देशात जाण्याचा विचार करत असाल. त्यामुळे कोणते ठिकाण आपल्यासाठी सर्वोत्तम असेल हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जेणे करून आपल्याला प्रवासात कोणत्याही अडचणींना  सामोरी जावे लागणार नाही. कारण बहुतेक पर्यटकांना ही ठिकाणे आवडतात, चला तर मग जाणून घेऊया ती सुंदर ठिकाणे कोणती आहेत. 
 
1 इंग्लंड - जर आपण प्रथमच परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर इंग्लंड हे सर्वोत्तम डेस्टिनेशन असेल.आपल्याला येथे एक्सप्लोर करण्यासाठी बरेच काही आहे. ज्याची सुरुवात आपण इंग्लंडच्या राजधानी पासून करू शकता.
 
2 बार्सिलोना -बार्सिलोना एक्सप्लोर करायचे असल्यास सुंदर इमारती आणि वास्तुकला, कला संग्रहालये आणि स्वादिष्ट पाककृती ही सर्वोत्तम ठिकाणे आहेत. हे पर्यटन स्थळ नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. हे जगातील सर्वोत्कृष्ट पर्यटन ठिकाणांपैकी एक आहे. जे पर्यटकांना एक्सप्लोर करायचे आहे. येथील उत्तम वाहतुकीसोबतच, खरेदी आणि उत्तम समुद्रकिनारे देखील येथील प्रेक्षणीय स्थळांमध्ये समाविष्ट आहेत. बार्सिलोना नेहमीच पर्यटकांच्या बकेट लिस्टमध्ये समाविष्ट आहे
 
3 जपान - जर आपण परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर जपान हे सर्वोत्तम ठिकाण आहे. जपान हा जगातील सर्वात सुरक्षित, स्वच्छ आणि सुनियोजित देश आहे. जे पर्यटकांना खूप आवडतात. तसे, जपानच्या प्रवासामुळे भारतीयांच्या खिशावर फारसा खर्च होणार  नाही. पण जपानला जाण्यासाठी विमानाची तिकिटे खूप महाग आहेत. ते परवडत असल्यास आपण  जपानला भेट देऊ शकता. 
 
4 तुर्की - प्रथमच परदेशी लोकांसाठी तुर्की हे एक अद्भुत ठिकाण आहे. इथले मोकळे निळे निरभ्र आकाश आणि पांढरीशुभ्र घरे अतिशय सुंदर दृश्ये देतात. त्याच वेळी, शतकानुशतके जुन्या सभ्यतेचे आकर्षण या देशाचे आहे. जो कोणत्याही पर्यटकाला आवडू शकतो. यासोबतच समुद्रकिनाऱ्यावर काळ्या दगडांची फौज आहे. जे सुंदर दिसते. जर तुम्ही इथे सहलीचा प्लान करत असाल तर जेवणापासून नाईट लाईफचा आनंद घ्यायला विसरू नका. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तारक मेहताच्या बबीताला अटक