suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक किल्ला कुठे आहे? ज्यात अनेक रहस्ये दडलेली आहे

Chittorgarh
भारतात अनेक प्राचीन ऐतिहासिक स्थळांचा वारसा लाभलेल्या आहे. देशात अनेक ठिकाणे आहे जे आज देखील इतिहासाची साक्ष देत भक्कमपणे उभी आहे. तसेच भारतात असंख्य प्राचीन गड-किल्ले आहे पण तुम्हाला माहित आहे का भारतातील सर्वात मोठा किल्ला कोणता आहे? माहिती नसेल तर आज आपण जाणून घेणार आहोत. 
 
राजस्थानमधील चित्तोडगड हा भारतातील सर्वात मोठा किल्ला आहे व हा किल्ला हा केवळ भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक मानला जातो. त्याचा इतिहास, वैशिष्ट्ये खूप महत्वपूर्व आहे. 
चित्तोडगड किल्ला त्याच्या विशाल क्षेत्रासाठी, ऐतिहासिक महत्त्वासाठी आणि शौर्यकथांसाठी जगभर प्रसिद्ध आहे.  चित्तोडगड किल्ला अंदाजे ७०० एकर परिसरात पसरलेला आहे आणि त्याचा घेर अंदाजे १३ किलोमीटर आहे. हा किल्ला एका उंच टेकडीवर बांधलेला आहे, ज्यामुळे त्याची सुरक्षा अधिक मजबूत झाली. शत्रूंना रोखण्याच्या धोरणात्मक योजनेचा भाग म्हणून किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी सात भव्य दरवाजे बांधण्यात आले होते.
 
या भव्य किल्ल्यात राजवाडे, मंदिरे, स्मारके आणि जलाशयांसह सुमारे ६५ ऐतिहासिक वास्तू आहे. येथे चार राजवाडे, १९ मंदिरे आणि असंख्य जलस्रोत आहे. तसेच चित्तोडगड किल्ला हा राजपुतांच्या शौर्याचे आणि त्यागाचे प्रतीक मानला जातो. किल्ल्यावर अनेक वेळा हल्ले झाले, प्रत्येक वेळी येथील योद्धे शेवटच्या श्वासापर्यंत लढले. हा किल्ला राणी पद्मिनीच्या बलिदान कथेसाठीही प्रसिद्ध आहे. ही घटना इतिहासातील शौर्य आणि त्यागाचे एक महान उदाहरण मानली जाते. तसेच एवढ्या मोठ्या किल्ल्यात पाणीपुरवठ्याची समस्या उद्भवू नये यासाठी असंख्य जलाशय आणि तलाव बांधण्यात आले होते. असे म्हटले जाते की, या जलस्रोतांमधून हजारो लोकांची गरज भागू शकली असती. चित्तोडगड किल्ला हे केवळ एक ऐतिहासिक स्मारक नाही, तर एक 'जिवंत किल्ला' देखील आहे.  
 
चित्तोडगड किल्ला हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. हा राजस्थानच्या डोंगरावरील किल्ल्यांचा एक भाग आहे आणि जगभरातील पर्यटक त्याची भव्यता पाहण्यासाठी येथे येतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

द इंडिया स्टोरी’ २४ जुलैला प्रदर्शित; काजल अग्रवाल–श्रेयस तळपदेची नवी जोडी चर्चेत