Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 1 April 2025
webdunia

इंग्लंडवरून आलेल्या ५४२ प्रवाशांपैकी १०९ प्रवाशांशी संपर्क नाही

109 passengers
, मंगळवार, 29 डिसेंबर 2020 (09:19 IST)
ब्रिटन तसेच इंग्लंडमधून भारतात परतणाऱ्यांची संख्या जास्त आहे. यातही पुण्यात इंग्लंडवरुन ५४२ प्रवासी आले आहेत. मात्र, यातील अनेकांचा शोध लागत नाही. त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे. १०९ जणांचा शोध सुरु असल्याचे वृत्त आहे.
 
इंग्लंडवरून आलेल्या ५४२ प्रवाशांपैकी १०९ प्रवाशांशी संपर्क होत नसल्याची माहिती हाती आली आहे. पत्ता आणि फोननंबरवरून त्यांना शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने या १०९ जणांचा शोध लागत नसल्याचे पोलिसांना कळवले आहे. आता त्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कर्नाटक: विधानपरिषदेचे उपसभापती धर्मेगौडा यांनी आत्महत्या केली, रेल्वे रुळावर मृतदेह सापडला