rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिरूर तालुक्यात बिबट्याचा हल्ल्या 13 वर्षीय रोहनचा मृत्यू

death
शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याचा वावर वाढला असून गेल्या 20 दिवसांत रविवारी दुपारी बिबट्याचा तिसरा बळी झाला आहे. रविवारी दुपारी बिबट्याने 13 वर्षीय रोहन विलास बोंबे याच्यावर हल्ला करून त्याला उसाचा शेतात नेले. बिबट्याच्या हल्ल्यात रोहनचा मृत्यू झाला. संतप्त ग्रामस्थांनी या प्रकरणी वनविभागविरोधात आक्रमक भूमिका घेतली. 
ग्रामस्थांनी संतापून वनविभागाची गाडी पेटवली बेस केम्पचे कार्यालयाला पेटवले. तसेच थोर भूमिका घेऊ पर्यंत रोहनचे शवविच्छेदन आणि अंत्य संस्कार केले जाणार नाही 
ALSO READ: हिंजवडीत प्रेमप्रकरणातून 18 वर्षीय तरुणीवर चॉपरने हल्ला, प्रियकर ताब्यात
सदर घटना रविवारी सुपारी 4:15 वाजेच्या सुमारासची घडली आहे. रोहन घराबाहेर खेळत असताना उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने रोहन वर हल्ला केला आणि त्याला उसाचा शेतात ओढत नेले. बराच वेळ रोहन दिसला नाही म्हणून लोकांनी त्याला शोधायला सुरु केले. तरुणांनी त्याला शोध घेतला असता त्याचा मृतदेह आढळला. या घटनेने परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण झाले. 
ALSO READ: पुण्यात कार मेट्रो स्टेशनच्या खांबाला धडकली; दोघांचा मृत्यू
या पूर्वी बिबट्याने 12 ऑक्टोबर रोजी शिवण्या बोंबे आणि 22 ऑक्टोबर रोजी भागुबाई जाधव यांना बळी बनवले. 20 दिवसांत तीन माणसे बळी गेल्यावर मात्र नागरिकांनी संताप व्यक्त केला असून घटनेनन्तर पंचतळे आणि रोडेवाडी फाटावर दीड ते 2 हजार ग्रामस्थांनी रास्तेरोको आंदोलन केले आणि वाहतूक कोंडी केली. परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला. प्रशासनाने या वर काही उपाययोजना केल्या नाही तर मतदानावर बहिष्कार टाकण्याचे गावकरी म्हणाले. 
 
Edited By - Priya Dixit  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुण्यातील नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालून ठार मारण्याचा वन विभागाचा आदेश