Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

१५४ विशेष रेल्वेगाड्या पुणे विभागातून २ लाख ६ हजार प्रवाशांना घेऊन रवाना

१५४ विशेष रेल्वेगाड्या पुणे विभागातून २ लाख ६ हजार प्रवाशांना घेऊन रवाना
पुणे , सोमवार, 8 जून 2020 (06:34 IST)
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान, बिहार, हिमाचल, झारखंड, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मिर, मणिपूर, आसाम, ओरिसा, पश्चिम बंगाल व मिझोराम या राज्यामधील 2 लाख 6 हजार 8 प्रवाशांना घेऊन पुणे विभागातून 7 जून 2020 अखेर 154 विशेष रेल्वेगाड्या रवाना झाल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
 
डॉ.म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागातून मध्य प्रदेशसाठी 15, उत्तर प्रदेशसाठी 62, उत्तराखंडसाठी 2, तामिळनाडूसाठी 2, राजस्थानसाठी 5, बिहारसाठी 36, हिमाचल प्रदेशसाठी 1, झारखंडसाठी 8, छत्तीसगडसाठी 5, जम्मू आणि काश्मीरसाठी 1, मणिपूरसाठी 1, आसामसाठी 1, ओरिसासाठी 2, पश्चिम बंगालसाठी 12 आणि मिझोराम 1 अशा एकूण 154  रेल्वेगाड्या 2 लाख 6 हजार 8 प्रवाशांना घेऊन रवाना झाल्या आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या व्यक्तींना घरी विलगीकरण करता येईल : आरोग्य विभाग