पत्नीच्या जाचाला कंटाळून पुण्यात एका 24 वर्षीय लष्करी जवानानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गोरख नानाभाऊ शेलार असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. भारतीय सेना दलात भरती निर्सग असीस्टन्ट या पदावर तो कार्यरत होता.
आत्महत्येपूर्वी या लष्करी जवानानं एक व्हिडीओ बनवला आणि एक चिठ्ठी देखील सोडली आहे. पोलीसांकडून हे सर्व जप्त करण्यात आले आहे. या आधारे पोलिसांनी जवानाची पत्नी आणि सासरच्या मंडळींवरिोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांनी पत्नीसह इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पत्नी अश्विनी युवराज पाटील, युवराज पाटील, संगिता युवराज पाटील, योगेश पाटील, भाग्यश्री पाटील यांच्यावर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत केशव पाटील (शेलार) यांनी तक्रार दिली आहे. वानवडी पोलिस आता या संपूर्ण घटनेचा चौकशी करत आहे आणि आरोपींना लवकरच अटक केला जाईल.
केशव पाटील (शेलार) यांनी तक्रारीत सांगितले की माझ्या भावाची पत्नी अश्विनी युवराज पाटील हिने माझ्या भावाला मानसिक त्रास दिला. पत्नी आणि सासरचे मंडळी गोरख याला त्रास देत होते. सोड चिठ्ठी दे आणि 15 लाख रुपये दे असे म्हणून त्याला त्रास दिला जात होता. या सततच्या मानसिक व शारिरीक छळाला कंटाळून त्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.