पुण्यातील एका शाळेतील 27 वर्षीय शिक्षिकेने इयत्ता दहावीतील एका 17 वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक केली आहे. शुक्रवारी पीडित मुलगा आणि आरोपी शिक्षकाला शाळेच्या एका खोलीत रंगे हाथ पकडल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
इयत्ता दहावीतील मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पुण्यातील एका नामवंत शाळेतील शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाळेत सध्या परीक्षा सुरु आहे. शाळेत शिक्षक, विद्यार्थी यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास एक शिक्षक शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर गेले असता त्यांनी एका खोलीचे दार बंद पहिले. त्यांनी दार उघडल्यावर शाळेतील शिक्षिका आणि इयत्ता दहावीचा 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याला आक्षेपार्ह अवस्थेत पहिले. त्यांनी सदर माहिती मुख्य्ख्याध्यापिकेला दिली. त्यांनी गोष्टीची खातरी करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ते दोघे एका खोलीत जातांना दिसले. त्यांनी दोघांकडे स्वतंत्र चौकशी केली. दोघांनी घडलेल्या प्रकाराची कबुली दिली.
या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी शिक्षिकेविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियमानुसार पास्को ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी या प्रकरणी शिक्षिकेला अटक केली आहे.