Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाण्याची टाकी कोसळून पुण्यात 3 मजुरांचा मृत्यू

पाण्याची टाकी कोसळून पुण्यात 3 मजुरांचा मृत्यू
, गुरूवार, 24 ऑक्टोबर 2024 (11:46 IST)
महाराष्ट्रातील पुणे येथील कामगार छावणीत आज सकाळी पाण्याची टाकी कोसळून तीन मजुरांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले आहे. काही मजूर पाण्याच्या टाकीखाली आंघोळ करत असताना ही घटना घडली आहे. तसेच ही घटना पिंपरी चिंचवड टाउनशिपमधील भोसरी परिसरात घडल्याचे सांगण्यात येत आहे. पाण्याच्या दाबामुळे या टाकीची भिंत फुटल्याने टाकी खाली कोसळली अशी माहिती समोर आली आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी भागात काही मजूर पाण्याच्या टाकीखाली आंघोळ करत असताना ही घटना घडली. तसेच या घटनेबाबत पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणाले की, पाण्याच्या दाबाने टाकी फुटली, त्यामुळे ती कोसळली व पाण्याच्या टाकीच्या खाली असलेले कामगार ढिगाऱ्यात अडकल्याचे त्यांनी सांगितले. या अपघात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : आदित्य ठाकरे-अमित ठाकरे निवडणूक लढवणार