राज्यात झिका व्हायरसचे तीन नवीन रुग्ण आढळले असून आता रुग्णांची संख्या 12 झाली आहे. पुणे महापालिकाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. राज्यात झिका व्हायरसची वाढती प्रकरणे पाहता इतर राज्यांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांसाठी एक सल्लागार जारी केला होता. आणि परिस्थतीतवर सतत लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले होते.
राज्यांना गर्भवती महिलांच्या झिका विषाणूच्या चाचणीकडे लक्ष देण्याचे आणि संक्रमित महिलांच्या गर्भाच्या विकासावर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मंत्रालयाने आरोग्य संस्थांना एक नोडल अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश दिले जे एडिस डासांच्या प्रादुर्भावापासून परिसर मुक्त ठेवण्यासाठी देखरेख ठेवतील आणि कारवाई करतील.
झिका विषाणूचा संसर्ग एडिस डासाच्या चाव्याव्दारे पसरतो. या डासामुळे डेंग्यू आणि चिकनगुनियाही होतो. झिका संसर्गामुळे मृत्यू होत नसला तरी, संक्रमित गर्भवती महिलेच्या बाळाला 'मायक्रोसेफली'ची समस्या असू शकते, ज्यामध्ये त्याच्या डोक्याचा आकार तुलनेने लहान होतो.
यावर्षी 2 जुलैपर्यंत पुण्यात झिकाचे सहा आणि कोल्हापूर आणि संगमनेरमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. आता पुण्यातच या संसर्गाचे तीन नवीन रुग्ण आढळले आहेत.