Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 3 April 2025
webdunia

बाहुलीला फाशी देत घेतला गळफास

suicide
पिंपरी चिंचवड , बुधवार, 1 जून 2022 (12:55 IST)
पुणे जिल्ह्यात आई कामात व्यस्त असताना आठ वर्षांच्या चिमुरड्याने आधी बाहुलीला गळफास लावून घेतला आणि नंतर स्वत: गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
 
 त्याने बाहुलीचा चेहरा कापडाने झाकून ठेवला, जसा कैदी फाशी देण्यापूर्वी आपला चेहरा झाकतो. बाहुली त्याला सोडून गेल्याचे समजल्यानंतर त्या मुलाने स्वतःच्या गळ्यात दोरी बांधून तिला मिठी मारली आणि गळफास घेतला. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला. ही घटना पिंपरीतील थेरगाव परिसरातील आहे.
 
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी दोनच्या सुमारास हा मुलगा आपल्या बाहुलीसोबत खेळत होता. त्यावेळी त्याचा लहान भाऊ आणि बहीणही जवळच खेळत होते. त्यावेळी मुलाची आई कामात व्यस्त होती. तर, वडील कामानिमित्त बाहेर गेले होते.
 
 घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सत्यवान माने यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्यांनी चौकशी केली असता मुलगा मोबाइलवर ‘हॉरर’चित्रफीत पाहत असल्याचे समोर आले.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Majhi Bhagyashree Kanya Yojana काय आहे माझी कन्या भाग्यश्री योजना? या प्रकारे 50 हजार रुपए प्राप्त होऊ शकतात