Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुणे ते हरिहरेश्वर सहलीसाठी 57 प्रवाशांना घेऊन निघालेली बस ताम्हिणी घाटात उलटली

accident
, शनिवार, 30 डिसेंबर 2023 (19:02 IST)
पुण्यातून ए.सी.एच कंपनीची 57 प्रवाशांना घेऊन सहलीला निघालेली बस ताम्हणी घाटात जाऊन उलटल्याने दोघांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. हा अपघात माणगाव तालुक्यात ताम्हिणी घाट जवळ झाला. 

सकाळी 8 वाजेच्या सुमारास पुण्यातून माणगावच्या दिशेने जाणारी बस रस्त्यावरून खाली उतरून जागेवरच पालटली. या बस मध्ये पुण्याच्या  ए.सी.एच कंपनीचे प्रवाशी होते. ही बस सहलीसाठी हरिहरेश्वरला जात होते. 
अपघाताची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचली आणि बचावकार्य सुरु केले. या अपघातात दोन महिलांचा दुर्देवी मृत्यू झाला. तर 55 जण जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. 
 
Edited By- Priya DIxit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

माजी महापौर संजोग वाघेरे यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला