बीडची 22 वर्षीय पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पोलीस तपास करत आहे.पोलिसांना पूजाच्या मोबाईल मधून बरेच कॉल रिकॉर्ड आढळले आहे.या मध्ये पूजा आणि माजी मंत्री संजय राठोड यांचे संभाषण आहे.हे संभाषण पूजाने आत्महत्या केल्याच्या पाच -सहा दिवसा पूर्वी केले होते.
पूजा चव्हाण ने 7 फेब्रुवारीला पुण्यात राहत्या घरात इमारती वरून उडी मारून आत्महत्या केली होती.या प्रकरणात माजी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव सातत्याने घेतले जात होते.माजी वनमंत्री संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांचे 90 मिनिटाचे संभाषण असल्याचे वृत्त मिळत आहे.हे संभाषण बंजारा समाजात असल्याचे वृत्त आहे.ही संभाषणे पूजाने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवली होती.या संभाषणात असलेला आवाज संजय राठोडचा असल्याचे सांगितले.
पोलिसांनी पूजाचा फोन फॉरेन्सिक टीमकडे पाठविला होता.त्यामुळे या संभाषणामुळे माजी वनमंत्री संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.या प्रकरणावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यावर संजय राठोड यांना आपल्या पदावरून राजीनामा द्यावा लागला.