Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फिटनेसचा संदेश देण्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्याने केले अशी वारी

Maharashtra Police
, शनिवार, 8 जानेवारी 2022 (15:40 IST)
फिटनेसचा संदेश देण्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्याने चक्क देहू ते पंढरपूर अशी 234 किलोमीटर सायकल वारी केली आहे. राम गोमारे असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. राम गोमारे हे हिंजवडी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी कार्यरत आहेत.
 
राम गोमारे हे हिंजवडी पोलीस ठाण्यात कार्यरत असून गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी मेहनत घेत सायकलिंग, स्विमिंग आणि धावण्याचा व्यायाम सुरू ठेवला आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हेदेखील फिटनेसच्या बाबतीत नेहमीच जागरूक असतात. त्यांचाच आदर्श समोर ठेवत राम गोमारे यांनीही फिटनेसला महत्त्वा दिले आहे. मात्र, आपण स्वतः तर धडधाकट राहूच पण पोलीस सहकारी, इतर मित्रांना देखील फिटनेसचे महत्त्व पटवून देऊ असे गोमारे यांनी म्हटले आहे.
 
दरम्यान, देहूमध्ये संत तुकाराम महाराज यांच्या मंदिरात दर्शन घेत गोमारे यांनी पंढरपूरपर्यंत सायकल प्रवास केला आहे. केवळ एका ठिकाणी दहा मिनिटांचा थांबा घेत गोमारे यांनी पंढपूर गाठले आहे. सलग आठ तास सायकल चालवत राम गोमारे यांनी देहू ते पंढरपूर असा २३४ किलोमीटर प्रवास केला आहे. करोनाकाळात पौष्टिक आहार आणि योग्य व्यायाम करणं गरजेचं असल्याचं सांगत राम गोमारे यांनी दररोज किमान एक तास स्वतःसाठी देऊन व्यायाम करण्याचे आवाहन केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईत काही भागांमध्ये पावसानं हजेरी