सध्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. निगडित कर्तव्यावर असलेले पोलीस अमलदाराचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बाळासाहेव महालिंग नंदुर्गे(38) असे त्यांचे नाव आहे. ते कर्तव्यावर असताना त्यांना हृदयविकाराचा त्रास होऊ लागला. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
नंदुर्गे हे बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील करंजी गावातील होते. ते शनिवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास कामावर गेले होते.ते डायल 112 हेल्पलाइनवर कर्तव्य बजावत असताना रविवारी सकाळी त्यांच्या छातीत दुखू लागले आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.त्यांना प्राथमिक उपचारासाठी निगडीच्या रुग्णालयात नेण्यात आले
नंतर पुढील उपचारासाठी थेरगावच्या रुग्णालयात नेले. तिथे उपचाराधीन असता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. नंदुर्गे हे कर्तव्यावर असताना हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाला. नंदुर्गे यांचावर करंजी त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्य संस्कार होणार.