Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यातील एका शास्त्रज्ञाचा व्हेंटिलेटर न मिळाल्याने मृत्यू

scientist
पुण्यातील एका निवृत्त शास्त्रज्ञाचा व्हेंटिलेटर न मिळाल्याने मृत्यू झाला आहे. डॉ. पी. लक्ष्मी नरसिंहन असे या शास्त्रज्ञाचे नाव आहे. ते 61 वर्षांचे होते त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ नरसिंहन यांना  श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्या रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. मात्र अखेर व्हेंटिलेटर न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
 
त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा  रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.डॉ. नरसिंहन हे पुण्यातील बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियातून ते वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते. काही वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले होते. त्यांच्यामागे पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एकनाथ शिंदें म्हणाले, सत्तेसाठी प्रतारण केली नाही…