Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुलावरून दुचाकी नेण्याचा प्रयत्न दोघा तरुणांच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना

webdunia
, गुरूवार, 11 ऑगस्ट 2022 (09:05 IST)
पुलावरून दुचाकी नेण्याचा प्रयत्न दोघा तरुणांच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना  घडली तोल गेल्याने दोघे तरुण दुचाकीसह पुलावरून नदीपात्रात पडून पुराच्या प्रवाहात वाहून गेले त्यांची दुचाकी मिळाली असली तरी सायंकाळी उशिरापर्यंत दोघांचा शोध लागला नव्हता
 
तालुक्यातील गाळणे येथील डाँ नाजिम पठाण यांचा मुलगा अब्दुल रहीम पठाण वय 16 व त्यांच्या मेहुण्याचा मुलगा शहजात जाकीर शेख वय 19 हे दोघे तरुण दुचाकी क्रमांक एम एच 41 आर 55 52 वरून गाळणे येथून मालेगावी आले होते द्याने येथील फरशी पुलावरून मौसमच्या पुराचे पाणी वाहत असताना देखील या तरुणांनी आपली दुचाकी पुलावरून दुसऱ्या बाजूस नेण्याचा प्रयत्न केला दोघे तरुण पुलावरून जात असताना पुराच्या पाण्याच्या वेगामुळे त्यांचा तोल गेल्याने ते दुचाकीसह पुलावरून मोसम नदी पात्रात पडून पुराच्या पाण्यात वाहून जाऊ लागले हे दृश्य बघणाऱ्यांनी आरडाओरोड केली मात्र पुराच्या पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने त्यांना वाचविण्याचे धाडस कोणी केले नाही .
 
या घटनेची माहिती मिळताच मनपा अग्निशमन दलाचे अधिकारी संजय पवार यांनी शकील अहमद रवींद्र महाले किरण सूर्यवंशी रवींद्र शेजवळ शुभम पाटील शेख वासिम आदी जवानांसह घटनास्थळी धाव घेत मोसम पात्रात तरुणांचा शोध घेण्यास प्रारंभ केला काही वेळेनंतर त्यांची दुचाकी पथकाच्या जवानांना मिळून आली मात्र सांडव्या पुला पर्यंत शोध घेऊन देखील दोघे तरुण मिळून आले नव्हते सायंकाळी अंधार पडल्याने ही शोध मोहीम थांबवण्यात आली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शेतकऱ्यांना दिलासा नाही, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय फसवा, अजित पवारांची टीका