Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 30 April 2025
webdunia

पुण्यात विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

suicide
, शुक्रवार, 2 सप्टेंबर 2022 (22:51 IST)
पुण्यातील भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन (FTI)संस्थेत शिक्षण घेणाऱ्या 28 वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मयत विद्यार्थिनी मूळची उत्तराखंड येथील नैनितालची होती. विद्यर्थिनीनी आत्महत्या का केली ह्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेमुळे एफटीआयमध्ये खळबळ माजली आहे. मयत विद्यार्थिनीचा मृतदेह एफटीआयच्या हॉस्टेल मध्ये  लटकलेल्या अवस्थेत आढळला आहे. पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेऊन मृतदेह ताब्यात घेतले आहे. ऑगस्ट महिन्यातील ही दुसरी घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या पूर्वी 5 ऑगस्ट रोजी देखील एका विद्यार्थिनींनी आत्महत्या केली होती. आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीच्या जवळच्या मित्र मैत्रिणींकडेही चौकशी करण्यात आली असून त्यासंबंधात काही गोष्टींचा उलघडा होता का त्याचाही तपास पोलिसांकडून चालू आहे.ही मुळची उत्तराखंडमधील नैनीतालमधील असून संस्थेच्याच हॉस्टेलमध्येच ती राहत होती. तिच्याच खोलीत तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Pakistan vs Hong Kong Asia Cup :हाँगकाँगचा संघ 38 धावांत गारद, पाकिस्तान सुपर-4 मध्ये पोहोचला